आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्टार्सना ऑफर झाला होता 'पुष्पा':या स्टार्सनी 'पुष्पा'ला नकार देऊन केली मोठी चूक, सर्वप्रथम महेश बाबूल ऑफर झाली होती पुष्पराजची भूमिका!

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या या स्टार्सविषयी...

'पुष्पा: द राइज पार्ट 1' या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. या चित्रपटाने कोरोनाच्या काळात 300 कोटींचा व्यवसाय केला आहे. याशिवाय 2021 च्या सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांमध्ये देखील याचा समावेश झाला आहे. 178 मिनिटांच्या या चित्रपटाची अ‍ॅक्शन-पॅक्ड कथा, लव्ह रोमान्स आणि साधे, अचूक संवाद प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अल्लू अर्जुनपासून ते रश्मिका मंदाना आणि सहाय्यक कलाकारांनाही त्यांचे अभिनय कौशल्य दाखवण्याची भरपूर संधी मिळाली आहे.

अल्लू अर्जुनच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर, त्याची खांदा उचलण्याची स्टाइल, बॉडी लँग्वेज आणि दाढीवरुन हात फिरवण्याचा अदंाज संपूर्ण चित्रपटात वाखाणण्याजोगा आहे.

त्याचवेळी रश्मिका मंदाना आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. खरं तर या दोन्ही स्टार्सना निर्माता-दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हती. यांच्यापूर्वी कोणत्या कलाकारांना चित्रपटातील भूमिका ऑफर करण्यात आली होती, ते जाणून घेऊया...

महेश बाबूने पुष्पराजच्या भूमिकेसाठी नकार दिला होता, त्यानंतर अल्लू अर्जुनला ही भूमिका ऑफर करण्यात आली आणि त्याने ती स्वीकारली.
महेश बाबूने पुष्पराजच्या भूमिकेसाठी नकार दिला होता, त्यानंतर अल्लू अर्जुनला ही भूमिका ऑफर करण्यात आली आणि त्याने ती स्वीकारली.
श्रीवल्लीच्या भूमिकेसाठी रश्मिका मंदाना ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. दिग्दर्शक सुकुमार यांची सामंथाने ही भूमिका करावी अशी इच्छा होती पण अभिनेत्री त्यासाठी तयार नव्हती.
श्रीवल्लीच्या भूमिकेसाठी रश्मिका मंदाना ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. दिग्दर्शक सुकुमार यांची सामंथाने ही भूमिका करावी अशी इच्छा होती पण अभिनेत्री त्यासाठी तयार नव्हती.
दिशा पटानीलाही 'ओ अंतावा'वर डान्स करण्याची ऑफर देण्यात आली होती पण तिनेही ती नाकारली.
दिशा पटानीलाही 'ओ अंतावा'वर डान्स करण्याची ऑफर देण्यात आली होती पण तिनेही ती नाकारली.
सामंथावर चित्रित केलेला 'ओ अंतावा' हा आयटम नंबर नोरा फतेहीला ऑफर करण्यात आला होता पण तिनेही तो करण्यास नकार दिला होता.
सामंथावर चित्रित केलेला 'ओ अंतावा' हा आयटम नंबर नोरा फतेहीला ऑफर करण्यात आला होता पण तिनेही तो करण्यास नकार दिला होता.
फहद फासिलच्या आधी, विजय सेतुपतीला भंवर सिंग शेखावतच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु तारखांच्या कमतरतेमुळे त्याने चित्रपट नाकारला.
फहद फासिलच्या आधी, विजय सेतुपतीला भंवर सिंग शेखावतच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु तारखांच्या कमतरतेमुळे त्याने चित्रपट नाकारला.
बातम्या आणखी आहेत...