आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:सांताक्रूझ पोलिस ठाण्यात महेश भट्ट यांची 2 तास चौकशी, रिया आणि सुशांतच्या संबंधासंदर्भात विचारले प्रश्न

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले- चौकशीसाठी ज्यांची गरज असले त्या सर्वांना बोलावले जाईल
  • पोलिस या प्रकरणात व्यवसायातील वैमनस्य असलेल्या पैलूंचा शोध घेत आहेत, आतापर्यंत 37 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोमवारी दिग्दर्शक-निर्माते महेश बट्ट यांची सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये सुमारे दोन तास चौकशी केली. सुशांत आणि रियाच्या नात्याबद्दल पोलिसांनी महेश भट्ट यांना प्रश्न विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुपारी 12 वाजता भट्ट पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि दुपारी अडीचपर्यंत त्यांची चौकशी झाली. मात्र, पोलिस स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर माध्यमांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर दिले नाही.

  • सडक -2 बद्दलही पोलिसांनी चौकशी केली

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी महेश भट्ट यांच्याकडे त्यांच्या आगामी सडक -2 या चित्रपटाविषयी विचारपूस केली. या चित्रपटात पहिले सुशांतला कास्ट करण्यात येणार होते. असेही म्हटले जाते की, आलिया भट्टापूर्वी सुशांत सिंह राजपूतने रियाचे नाव महेश भट्ट समोर ठेवले होते. मात्र, नंतर हा चित्रपट आदित्य रॉय कपूरला ऑफर करण्यात आला. पोलिसांनी सुशांतला चित्रपटात न घेण्याचे कारणही महेश भट्ट यांना विचारले आहे.

  • चौकशीची जागा बदलली

महेश भट्ट यांना चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले. पण मीडियाची गर्दी पाहून भट्ट यांनी पोलिसांना सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये येण्याची विनंती केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. याशिवाय आता धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांनाही चौकशीसाठी बोलावले जाईल.

  • व्यावसायिक वैमनस्याचा आरोप कंगनाने केला आहे

पोलिस या प्रकरणात व्यवसायातील वैमनस्याच्या पैलूंवरही चौकशी करत आहेत. काही लोकांनी गटबाजी करुन ठेवली आहे आणि बाहेरच्या लोकांना इंडस्ट्रीत प्रवेश करू दिला जात नसल्याचा आरोप कंगनाने केला होता. देशमुख म्हणाले की, पोलिस या आरोपांचाही शोध घेत आहेत आणि गरज पडेल अशा सर्व जणांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाईल.

  • आतापर्यंत 37 लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत

देशमुख म्हणाले की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 37 जणांचे जबाब नोंदवले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी वांद्रेच्या घरात आत्महत्या केली. घरातून पोलिसांना सुसाइड नोट सापडली नाही, परंतु आऊटसाइडर असल्याने काही लोकांनी त्याचे करिअर उद्धवस्त केले, त्याला कंटाळून सुशांतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे.

  • महेश भट्ट आणि करण जोहर सतत ट्रोल होत आहेत

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महेश भट्ट आणि करण जोहर सातत्याने ट्रोल होत आहेत. करण जोहर वर सुशांतचे करिअर खराब केल्याच्या आरोप लावला जात आहे. आलिया भट्ट, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अनेक स्टार किड्ससुद्धा या प्रकरणी ट्रोल होत आहेत.