आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्रीविरूद्ध मानहानीचा खटला:लविना लोधविरोधात कोर्टात पोहोचली महेश भट्टची बहीण, बिनशर्त माफीनामा आणि 90 लाख रुपये नुकसान भरपाईची केली मागणी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लविनाच्या आरोपांवर भट्ट बंधूंच्या वतीने स्पष्टीकरण आले आहे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मुकेश भट्ट यांची बहीण कुमकुम सहगल आणि त्यांचा भाचा साहिल यांनी अभिनेत्री आणि मॉडेल लविना लोध हिच्याविरोधात बॉम्बे सिटी सिव्हील कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे. यात त्यांनी लविनाकडे माफी आणि 90 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

अलीकडेच लविनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सुमित सभरवालला आपला पती आणि महेश भट्ट यांचा भाचा असल्याचे म्हटले होते. सुमित हा ड्रग्ज आणि मुली सप्लाय करतो, त्यामुळे तिने त्याच्याकडे घटस्फोट मागितला. तेव्हापासून महेश भट्ट आपल्यामागे हात धुवून लागले आहेत. त्यांनी घरात शिरुन आपल्याला घराबाहेर काढण्याच्या प्रयत्न केला होता, असा खळबळजनक आरोप लविनाने केला आहे.

  • लविनाने बिनशर्त माफी मागावी

लविनाने आमच्याविरोधात केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांसाठी बिनशर्त माफी मागावी आणि 90 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश जारी करण्याचे आदेश कोर्टाने द्यावे, अशी अपील कुमकुम आणि साहिल यांनी कोर्टाकडे अपील केली आहे. तसेच, अभिनेत्रीने आक्षेपार्ह व्हिडिओ काढण्याचीही मागणी केली आहेत.

  • सहगल यांनी सुमित त्यांचा दूरचा नातेवाईक असल्याचा दावा केला आहे

सहगल यांनी वकील रिझवान मर्चंट यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, लविनाने 2010 मध्ये त्यांचा दूरचा नातेवाईक सुमित सभरवालशी लग्न केले होते. हे जोडपे त्यांच्या वर्सोवा फ्लॅटमध्ये राहत होते. ते हा फ्लॅट रिक्त करत नव्हते, म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या महिन्यात त्यांना फ्लॅट रिकामे करण्याची नोटीस देण्यात आली होती, म्हणूनच लविनाने आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि पती (जो आता तिच्यासोबत राहात नाही) त्याच्यासोबत वैयक्तिक वैर काढण्यासाठी तिने हा मार्ग निवडला.

  • लविनाने शेअर केलेल्या व्हिडिओत काय म्हटले होते?

व्हिडिओमध्ये लविना म्हणाली - “माझे नाव लविना लोध असून हा व्हिडिओ मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी करत आहे. माझे लग्न महेश भट्टच्या भाच्यासोबत सुमित सभरवाल सोबत झाले असून मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. सुमित ड्रग्ज सप्लाय करतो. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो आहेत. यात अमायरा दस्तूर आणि अशा अनेक अभिनेत्रींचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत आणि हे फोटो तो दिग्दर्शकांना दाखवतो. तो कलाविश्वात मुली सप्लाय करतो. या सगळ्याची कल्पना महेश भट्टला आहे”, असे आरोप लविनाने केले होते.

लविना पुढे म्हणाली -महेश भट्ट हे बॉलिवूडमधील डॉन आहेत. त्यांच्या एका फोनमुळे एखाद्या कलाकाराचे आयुष्य उद्धस्त होऊ शकते. अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि संगीतकारांना त्यांनी कामावरुन काढून टाकले, असे ती म्हणाली.

  • या प्रकरणात भट्ट बांधवांचे स्पष्टीकरण

लविनाच्या आरोपांवर भट्ट बंधूंच्या वतीने स्पष्टीकरण आले आहे. त्यांच्या लीगल टीमने लविनाचे सर्व आरोप फेटाळून लावताना म्हटले की, “लविना लोधने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओच्या संदर्भात. आम्ही आमचे क्लायंट महेश भट्ट यांच्या वतीने हे आरोप फेटाळतो. हे आरोप केवळ खोटे आणि अपमानकारक नसून कायद्यात गंभीर परिणाम असणारे आहेत. आमचे क्लायंट कायदेशीर सल्ला घेतील आणि योग्य कारवाई करतील.''