आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चित्रपटाचे निर्माता मुकेश भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे भाऊ महेश भट्ट यांनी विशेष फिल्म्स या फॅमिली बॅनरच्या क्रिएटिव्ह कन्सल्टंट पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी एका मुलाखतीत मुकेश भट्ट यांनी स्पष्टीकरण देताना आम्हा दोन्ही भावंडांमध्ये कोणतेही भांडण नाही, असे म्हटले आहे. उलट विशेष फिल्म्स ही कायमच त्यांचीच कंपनी होती. महे त्यात फक्त सल्लागार म्हणून काम करत होते. आता मुकेश भट्ट यांची मुले साक्षी आणि विशेष या बॅनरचा कार्यभार सांभाळणार आहेत.
'महेश विशेष फिल्म्समधून बाहेर झालेले नाहीत'
एका इंग्रजी वेबसाइटसोबत बोलताना मुकेश म्हणाले, "महेश विशेष फिल्म्समधून बाहेर झालेले नाही. विशेष फिल्म्स ही माझी कंपनी आहे. दिग्दर्शन सोडल्यानंतरही माझे भाऊ ब-याच प्रोजेक्टसाठी क्रिएटिव्ह सल्लागार म्हणून काम करत होते. यापुढेही मला जेव्हाही त्यांची गरज असेल तेव्हा ते तिथे माझ्या मदतीसाठी हजर असतील. आमच्यात मतभेद किंवा भांडण झालेले नाही. त्यांना केवळ आता क्रिएटिव्ह कन्सल्टंट या पदावर राहायचे नाही."
'साक्षी आणि विशेष सांभाळणार कंपनीचा कार्यभार'
मुकेश पुढे म्हणाले, "माझी मुले साक्षी आणि विशेष कंपनीचा वारसा पुढे नेतील. त्यांच्याकडे अनेक चांगल्या कल्पना आहेत. माझ्या अनुभवांसह त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी तिथे सदैव असणार आहे. आता चित्रपट निर्मितीमध्ये मुलांना पुढे जाण्याची वेळ आली आहे," असे मुकेभ भट्ट म्हणाले.
विशेष फिल्म्सचा अखेरचा रिलीज झालेला चित्रपट 'सडक 2'
विशेष फिल्म्सच्या बॅनरखाली अखेरचा रिलीज झालेला चित्रपट 'सडक 2' होता. हा चित्रपट महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता. या कंपनीत जवळपास 24 वर्षानंतर महेश भट्ट दिग्दर्शक म्हणून परत आले. 1996 मध्ये त्यांनी विशेष फिल्म्सच्या बॅनरमध्ये तयार झालेला 'दस्तक' आणि इतर काही चित्रपटांसाठी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती.
विशेष फिल्म्सच्या बॅनरमध्ये आतापर्यंत 'डॅडी', 'आशिकी', 'सडक', 'दुश्मन', 'राज', 'मर्डर', 'जहर', 'गँगस्टर' आणि 'जन्नत' या चित्रपटांची निर्मिती झाली आहे. यापैकी 'राज', 'मर्डर' आणि 'जन्नत' असे अनेक चित्रपट फ्रँचायझीखाली बनले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.