आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Mahesh Manjrekar, Who Was Suffering From Bladder Cancer, Was Discharged From The Hospital After Surgery, Daughter Saiee Said – He Is Very Strong, I Am Proud Of Him

हेल्थ अपडेट:महेश मांजरेकर यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, मुलगी सई म्हणाली - 'ते खूप स्ट्राँग आहेत आणि मला त्यांचा अभिमान आहे'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडिलांची प्रकृती बघून सई म्हणाली की तिच्यासाठी या संमिश्र भावना होत्या.

कांटे, रेडी, दबंग आणि वाँटेड या चित्रपटांमध्ये झळकलेले सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना काही दिवसांपूर्वी मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर मुंबईतील एच एन रिलायन्स इस्पितळात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. सध्या महेश यांची प्रकृती स्थिर असून ते राहत्या घरी विश्रांती घेत आहेत. महेश मांजरेकर यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असून त्यांची मुलगी आणि अभिनेत्री सई मांजरेकर यांनी अपडेट दिला आहे.

अलीकडेच हिंदुस्तान टाइम्सशी केलेल्या संभाषणात 'दबंग 3' फेम अभिनेत्री सई म्हणाली, 'ते आता ठीक आहेत आणि पूर्वीपेक्षा चांगले आहेत. मी सध्या त्यांच्याबद्दल जास्त काही सांगू शकत नाही. कारण सध्या ते याविषयी बोलण्यास कम्फर्टेबल नाहीत. म्हणून बरे झाल्यानंतर ते स्वत: त्यांचा अनुभव सांगतील.'

सई पुढे म्हणाली, 'मोजक्या शब्दांत सांगायचे झाले तर ते खूप स्ट्राँग आहेत आणि मला त्यांचा अभिमान आहे.' वडिलांची प्रकृती बघून सई म्हणाली की तिच्यासाठी या संमिश्र भावना होत्या. ती म्हणाली, 'जर मी याविषयी बोलत राहिले तर मला वाटते की मी बरेच काही सांगत राहिल. मला याक्षणी याबद्दल बोलायचे नाही. मी त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करते आणि याक्षणी त्यांना याबद्दल काहीही बोलायचे नाही.'

सलमान खानसोबत साजरा केला होता वाढदिवस
महेश मांजरेकर यांनी 16 ऑगस्ट रोजी वयाची 63 वर्षे पूर्ण केली. त्यांनी हा दिवस इंडस्ट्रीतील त्यांच्या जवळच्या मित्रांसोबत घरी साजरा केला होता. त्यांच्या बर्थडे पार्टीत सलमान खान देखील उपस्थित होता. अलीकडेच ते डिस्ने प्लस हॉटस्टारच्या 1962: द वॉर इन द हिलमध्ये झळकले होते. सोबतच छोट्या पडद्यावर महेश 'बिग बॉस मराठी' चे सूत्रसंचालन करताना दिसतात. लवकरच ते 'बिग बॉस मराठी' सीजन 3 चे सूत्रसंचालन करताना देखील दिसणार आहेत. यासोबतच वाढदिवसाच्या निमित्ताने महेश यांनी 'व्हाइट' या चित्रपटाची देखील घोषणा केली आहे. याशिवाय महेश स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'स्वातंत्र्यवीर सावरकर' याचीही निर्मिती करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...