आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महेश मांजरेकर लवकरच आगामी 'टॅक्सी नंबर 24' चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून जयंत सांकला यांनी काम केले आहे. चित्रपटाविषयी जयंत सांकला म्हणाले, इतके तगडे कलाकार असलेल्या अद्वितीय सिनेमासाठी काम करण्याचा अनुभवसुद्धा अद्वितीय होता. मी महेश सरांना पहिल्यांदा कांटे या चित्रपटात पाहिले आणि तेव्हापासून मी त्यांच्या प्रेमातच पडलो. त्यामुळे, त्यांच्या सिनेमासाठी संगीत देण्याबद्दल मला दिग्दर्शक सौमित्र यांनी विचारल्यावर मी लगेचच होकार दिला,' असे जयंतने सांगितले.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सौमित्र सिंग याने केले असून साविराज शेट्टी यांनी निर्मिती केली आहे. जयंत यांनी या सिनेमाला उत्तम संगीत दिले असून त्यांनी यात एक गाणे लिहिले देखील आहे. 'मी पार्श्वसंगीताला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हा सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमा असल्यामुळे यात आवाजाचे चढ-उतारदेखील त्याला साजेसेच ठेवले आहेत. सिनेमाच्या थीम ट्रॅकमुळे आपल्याला 80 च्या दशकातला रॉक अण्ड रोल फील येईल. मी यात जन्नत दिखा दू हा च्रॅक जॅझ प्रकारात तयार केला असून या गाण्यावर रसिक श्रोत्यांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी आतूर झालो आहे,'असे ते म्हणाले.
जयंत सांकला आणि दिग्दर्शक सौमित्र सिंग यांचा एकत्र असा 'टॅक्सी नंबर 24' हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी सौमित्र सिंग यांच्यासोबत जयंत सांकला यांनी नसिरुद्दिन शहा आणि नवनी परिहार यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'द वॉलेट' या लघुपटासाठी काम केले होते.
जगजीत संधू आणि अनंगषा बिस्वास हे दोघे मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमामध्ये समीर हा तरुण दिवसभराच्या दगदगीनंतर लाल बहादूर या टॅक्सी चालकाच्या टॅक्सीत बसतो. एक सायकोकिलर शहरात मोकाट फिरत असतो. चित्रपटात लाल बहादूरची भूमिका महेश मांजरेकरांनी साकारली आहे. चित्रपटात त्यांच्यासह गिरीश शर्मा, रजत अरोरा, शालिनी चौहान, अमिशा सिन्हा, अंकिता साहू, तुशर रूंगता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.