आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा1997मध्ये प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या 'परदेस' चित्रपटाने रात्रीतून एका अनोळखी चेह-याला स्टार बनवले. ही तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री महिमा चौधरी आहे. पहिल्याच चित्रपटात बॉलिवूड स्टार शाहरुख खानसह काम करून लोकप्रियता मिळवली. आज महिमा चौँधरीचा वाढदिवस आहे. खूप कमी लोकांना ठाऊक आहे, की महिमाचे खरे नाव ऋतू चौधरी आहे.
13 सप्टेंबर 1973 रोजी दार्जिलिंग, पश्चिम बंगालमध्ये महिमाचा जन्म झाला. तिने 1997 मध्ये डायरेक्टर सुभाष घईच्या 'परदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता. महिमाचे खरे नाव ऋतू चौधरी आहे. महिमा हे नाव तिला सुभाष घई यांनी दिले होते. महिमा 90 च्या दशकाच्या सुरुवातीला टीव्हीवर जाहिरात करायची. यामध्ये आमिर खान आणि ऐश्वर्यारायसोबत तिने केलेली जाहिरात खुप प्रसिध्द आहे. यासोबतच तिने टीव्ही चॅनलवर व्हिजे म्हणूनही काम केले आहे.
त्यावेळी सुभाष घई त्यांच्या 'परदेस' या चित्रपटासाठी एका फ्रेश चेह-याच्या शोधात होते. यासाठी त्यांनी 3000 मुलींच्या ऑडीशन घेतल्या होत्या. मात्र एका कार्यक्रमात त्यांची नजर महिमावर पडली आणि त्यांचा शोध संपला.
'परदेस' सिनेमानंतर 'दाग द फायर'मध्येसुध्दा महिमाने चांगला अभिनय केला होता. 'धडकन' चित्रपटात महिमाने सेकंड लीड साकारली होती. तिने कुरुक्षेत्र, लज्जा, दिल है तुम्हारा, ओम जय जगदीश आणि धडकन सारख्या डझनभर चित्रपटांमध्ये काम केले तिला करिअरच्या सुरुवातीच्या काळात चांगली लोकप्रियता मिळाली. मात्र ती आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करु शकली नाही.
टेनिस प्लेअर लिएंडर पेससोबत होते अफेअर
टेनिस प्लेअर लिएंडर पेससोबत महिमाचे दिर्घकाळ अफेअर सुरु होते. दोघे जवळजवळ सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, असे म्हटले जाते. पेससोबतच्या अफेअरमुळे तिचे चित्रपट करिअर धोक्यात आले होते. परंतु नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर चर्चा रंगली होती की, लिएंडर महिमासोबतच मॉडेल रिया पिल्लईला डेट करत होता. हे समजल्यानंतर महिमा लिएंडरपासून वेगळी झाली.
लग्नापुर्वी प्रेग्नेंट झाली होती महिमा
महिमाने 2006 मध्ये आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले होते. बॉबीसोबत लग्न होण्याच्या काही दिवसांनंतरच तिने प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली. यानंतर मीडियामध्ये चर्चा होती की, महिमा लग्नापुर्वीच प्रेग्नेंट असल्यामुळे तिने तात्काळ लग्न केले. परंतू महिमाने ही गोष्ट कधीच मान्य केली नाही. महिमा आणि बॉबीला एक मुलगी आहे, तिचे नाव आर्यना आहे. परंतू आता हे दोघं वेगळे झाले आहेत. मुलीचा ताबा महिमाकडे आहे.
आता कुठे आहे महिमा?
महिमा शेवटची 2016 मध्ये आलेल्या 'डार्क चॉकलेट' या चित्रपटात झळकली होती. सध्या महिमा चित्रपटांपासून दूर आहे. आणि मुंबईत मुलीसोबत राहते. पती बॉबीपासून वेगळी झाल्यानंतर ती आता मुलीचा एकटीने सांभाळ करतेय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.