आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिमा चौधरीची कॅन्सरशी लढ्याची कहाणी:रुटीन चेकअपमध्ये कळलं ट्युमर आहे, नंतर बायोप्सीमध्ये झाले होते कॅन्सरचे निदान

अरुणिमा शुक्ला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज महिमा चौधरीचा वाढदिवस आहे, जिने शोमॅन सुभाष घईंच्या 'परदेस' या चित्रपटातून शाहरुख खानसोबत रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होता. परदेस चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आणि महिमाच्या स्मितहास्याने तिला नॅशनल क्रश ही पदवी मिळवून दिली. यानंतर दाग सारख्या चित्रपटातही तिचे कौतुक झाले. एका अपघाताने मात्र ती चित्रपटांपासून दुरावली होती. दोन महिन्यांपूर्वी अभिनेते अनुपम खेर महिमा कॅन्सरशी लढा देत असल्याचा खुलासा केला होता.

या बातमीने ती पुन्हा एकदा चर्चेत आली. आता ती पुन्हा चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. आज वाढदिवसानिमित्त महिमाने तिचा चित्रपट प्रवास आणि कॅन्सरशी दिलेल्या लढाबद्दल सांगितले. महिमा स्वतः तिच्या करिअर आणि कॅन्सरबद्दल सांगत आहे. सिनेसृष्टीतील प्रवास आणि जीवघेण्या आजाराशी दिलेली लढाई, वाचा तिच्याच शब्दांत...

कमर्शिअल जाहिरातींमध्ये ब्रेक कसा मिळाला?

दिल्लीत झालेल्या पेप्सी अॅडसाठी मी ऑडिशन दिली होती. मी एक अशी मॉडेल होती जिची दिल्लीतून निवड झाली होती आणि आमिर-ऐश्वर्याची निवड मुंबईतून झाली होती. ही त्या काळातील प्रसिद्ध जाहिरातींपैकी एक होती आणि ती जाहिरात त्या काळातील सर्व क्रिकेट सामन्यांच्या मध्यभागी दाखवली जात होती. या जाहिरातीनंतरच मला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.

मला या जाहिरातीनंतर लगेचच चित्रपटांमध्ये दिसण्याची इच्छा नव्हती, कारण त्यावेळी माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता होती, म्हणून मी आणखी अनेक व्यावसायिक जाहिराती केल्या. मी माझ्या कारकिर्दीत जवळपास 100 व्यावसायिक जाहिरातींमध्ये काम केले आहे. त्यानंतर मी चॅनल V साठी व्हिडिओ जॉकी म्हणून काम केले. मी या वाहिनीचा लोकप्रिय शो पब्लिक डिमांड व्हीजे म्हणून होस्ट करायचे, पण काही काळानंतर मी ही नोकरी सोडली कारण मला आयुष्यात व्हीजे म्हणून नाही तर अभिनेत्री म्हणून काम करायचे होते.

फिल्मी दुनियेत तुझा प्रवेश कसा झाला?

त्यानंतरच मला परदेस चित्रपटासाठी ऑडिशनचा कॉल आला. मी या चित्रपटासाठी ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली. माझा पहिलाच चित्रपट परदेस खूप गाजला. यानंतर माझा दुसरा ‘दाग’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला, तोही खूप गाजला होता.

रस्ता अपघातानंतर चित्रपटात कमबॅक कसे केले?

दुसरा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्याने माझा अपघात झाला. त्यावेळी मी प्रकाश झा यांच्यासोबत अजय देवगण प्रोडक्शनच्या चित्रपटाचे शूटिंग करत होते. या अपघातानंतर मी फिल्मी दुनियेतून बराच ब्रेक घेतला, पण तो चित्रपट मी पूर्ण केला होता. अपघातानंतर माझा आत्मविश्वास थोडा कमी झाला, पण मी हार मानली नाही. बरी झाल्यानंतर मी धडकन, बागबान सारखे सुपरहिट चित्रपट केले. त्यानंतर लग्न आणि मूल होईपर्यंत मी चित्रपटांमध्ये काम केले.

कर्करोगाचे निदान झाल्यानंतर तू स्वतःला कसे सांभाळले?

माझी नियमित वार्षिक चाचणी झाल्यावर मला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. ही चाचणी मी दरवर्षी करायचे. त्यावेळी मला काहीतरी विचित्र वाटले, मग मी ही गोष्ट डॉक्टरांनाही सांगितली, पण त्यांनी सांगितले की सर्व काही ठीक आहे, पण तरीही आम्ही त्याची बायोप्सी करू. मग डॉक्टरांनी बायोप्सी केली, पण ती सापडली नाही कारण माझी गाठ खूपच लहान होती. डॉक्टर म्हणाले की, नंतर त्या गाठीचा कॅन्सर होऊ शकतो, त्यामुळे आता तातडीने ती काढून टाका. त्यानंतर माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्या शस्त्रक्रियेदरम्यान मला कर्करोग झाल्याचे आढळून आले. जगातील सातपैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग होतो.

मी फार धाडसी नाही, तरीही मी सर्वजण करतात तशीच परिस्थीत हाताळली. पहिले लोक रडतात की हे आमच्याबाबतीच का घडले आणि नंतर देवाची इच्छा असे म्हणत संकटाला सामोरे जातात. कर्करोगावरील उपचार हा अत्यंत भयावह अनुभव आहे. लोकांच्या पाठिंब्याने, मित्र, कुटुंबाच्या मदतीने मी प्रत्येक दिवस पुढे जात होते. त्यावेळी माझी छोटीशी मुलगी मोठी झाली होती. या काळात तिने आईप्रमाणे माझी काळजी घेतली होती.

जेव्हा माझी तब्येत बिघडली होती, त्या काळातही मी काम करायचे, शो करायचे. दरम्यान एकदा विमानतळावर अनुपम खेर यांच्याशी माझी भेट झाली होती. त्यानंतर पाच दिवसांनी मला अनुपमजींचा फोन आला की, एक चित्रपट आहे आणि तो तुला करायचा आहे, असे ते म्हणाले. मी त्यांना सांगितले की, दर 20 दिवसांनी माझी ट्रीटमेंट असते, आणि त्यांनतर मी खूप विक होते. जर मी हा चित्रपट केला तर मला विग घालून तो करावा लागेल. यानंतर अनुपम यांनी मला विग घालण्यामागील कारण विचारले. त्यावेळी मी त्यांना मला कॅन्सर झाल्याचे सांगितले. मग ते म्हणाले की हा चित्रपट तुलाच करावा लागले, विग घालावा लागला तरीसुद्धा तूच हा चित्रपट करशील. त्यानंतर मी तो चित्रपट केला आणि आता मी कंगना रनोटच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

बातम्या आणखी आहेत...