आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेस्ट कॅन्सरमधून बरी झाली अभिनेत्री:माझ्या आजारपणात मुलीने शाळा सोडली, घर सांभाळले - महिमा चौधरीचा खुलासा

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिमाची मुलगी तिची आणि घराची काळजी घेत असे

ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झालेली अभिनेत्री महिमा चौधरी सध्या लखनऊमध्ये अनुपम खेर यांच्यासोबत 'द सिग्नेचर' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यादरम्यान, एका मुलाखतीत तिने तिची मुलगी आर्यनाबद्दलही बरेच काही सांगितले. मी कर्करोगाशी झुंज देत होती, तेव्हा माझ्या मुलीने शाळा सोडली होती, असा खुलासा महिमाने केला.

महिमाची मुलगी तिची आणि घराची काळजी घेत असे
महिमाने सांगितले, 'जेव्हा मी कर्करोगाच्या रिकव्हरी स्टेजवर होते, तेव्हा माझ्या मुलीने शाळा सोडली. तिने घर सांभाळले. त्यावेळी ती ऑनलाइन अभ्यास करत असे. कोविडच्या जोखमीमुळे ती शाळेत जात नसल्याचे तिने मला सांगितले. कोविडनंतर जेव्हा शाळा पुन्हा सुरू झाल्या, तेव्हादेखील ती शाळेत गेली नाही आणि तिने माझी आणि घराची काळजी घेतली," असे ती म्हणाली.

महिमा शूटिंग सेटवर परतली आहे
दरम्यान महिमाचा विग घातलेला एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती पूर्वीसारखीच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये, अनुपम तिला चित्रपटाचे शीर्षक विचारतात तेव्हा ती 'लास्ट सिग्नेचर' असे सांगते. तेव्हा अनुपम म्हणतात, 'लास्ट काढून टाका'. यानंतर महिमा 'सिग्नेचर' म्हणते.

अनुपम यांनी महिमाच्या कॅन्सरबाबत खुलासा केला
नुकताच अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन महिमाला कॅन्सर झाल्या खुलासा केला होता. अनुपम खेर यांनी मला एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी बोलावले होते, तेव्हा मी त्यांना माझ्या आजाराबद्दल सांगितले, असे महिमाने या व्हिडिओत सांगितले होते. यावेळी ती भावूक झालेली दिसली. व्हिडिओ शेअर करताना अनुपम यांनी महिमाला हिरो म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये महिमाच्या बाल्ड लूकने लक्ष वेधून घेतले होते. या सगळ्यात दिलासादायक बाब अशी की, स्क्रिनिंगच्यावेळी महिमाला आपल्याला कॅन्सर असल्याचे कळले होते. तिने वैदयकीय उपचार घेऊन त्याजागेवरील कँसर सेल हटविल्या आहेत.

महिमाने दिली ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज
अनुपम यांनी लिहिले, "माझा 525 व्या चित्रपट 'द सिग्नेचर'मध्ये मुख्य भूमिकेसाठी विचारणा करण्यासाठी मी महिमा चौधरीला महिन्याभरापूर्वी अमेरिकेतून फोन केला होता. तेव्हा मी अमेरिकेत होतो. आमची चांगली चर्चा झाली आणि तेव्हाच मला कळले की ती स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. तिची जीवन जगण्याची पद्धत, संघर्ष आणि दृष्टिकोन जगभरातील अनेक महिलांना नवीन प्रेरणा देऊ शकते," असे अनुपम म्हणाले.

अनुपम म्हणाले - महिमा पुन्हा अभिनयात परतण्यास तयार आहे
अनुपम यांनी पुढे लिहिले की, 'तिचा हा प्रवास मी सर्वांसमोर आणावा अशी तिची इच्छा होती. लोकांना हे सांगताना मी त्याचा एक भाग व्हावे, अशी तिची इच्छा होती. तिने माझे कौतुक केले, पण मला 'महिमा तू माझी हिरो आहेस' असे म्हणायचे आहे. मित्रांनो! तिला तुमचे प्रेम, शुभेच्छा, प्रार्थना आणि आशीर्वाद द्या. आता ती सेटवर परतली आहे. ती पुन्हा उड्डाण करण्यास तयार आहे. जय हो,' असे ते म्हणाले.

महिमाने 1999 पासून केली आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात
महिमाचा जन्म 13 सप्टेंबर 1973 रोजी दार्जिलिंगमध्ये झाला. त्यानंतर महिमाने तिच्या करिअरची सुरुवात 1999 मध्ये आलेल्या 'परदेस' या चित्रपटातून केली होती, ज्यामध्ये तिच्यासोबत शाहरुख खान होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. मात्र, या चित्रपटानंतर तिला पुन्हा हवे तसे यश मिळाले नाही. 2006 मध्ये महिमाने बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले आणि 2013 मध्ये दोघे विभक्त झाले. महिमाला एक मुलगी आहे. याशिवाय महिमाने 'धडकन', 'कुरुक्षेत्र', 'बागबान', 'डार्क चॉकलेट' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. महिमा 2016 मध्ये बंगाली क्राईम थ्रिलर 'डार्क चॉकलेट'मध्ये शेवटची दिसली होती. या चित्रपटात तिच्यासह रिया सेनही मुख्य भूमिकेत होती.

बातम्या आणखी आहेत...