आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी अभिनेत्रीचे दुःख:पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीमुळे घाबरली होती रईस फेम माहिरा खान, म्हणाली - भीतीपोटी मी भारतीय वेब सीरिज करण्यास नकार दिला

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2019 मध्ये पाक कलाकारांवर घालण्यात आली होती पूर्ण बंदी

शाहरुख खान स्टारर ‘रईस’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचे एक वक्तव्य सध्या खूपच चर्चेत आहे. हे वक्तव्य तिने बॉलिवूड आणि वेब सीरिजसंदर्भात केले आहे. रईस या चित्रपटानंतर आपल्याला अनेक भारतीय वेब सीरिज ऑफर झाल्या होत्या, पण भीतीपोटी त्या सर्व नाकारल्याचे माहिरा म्हणाली आहे. माहिरा एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे आणि अलीकडेच तिने Zee5 ची एक आगामी वेब सीरिज साइन केली आहे.

'मी खूप घाबरले होते'

माहिरा म्हणाली, 'पाक कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी घातल्याचे दु:ख वाटते. मला भारतीय वेब सीरिजमध्ये काम करण्याची भीती वाटते. त्यामुळे मला जेव्हा डिजिटल प्लेटफॉर्मवरुन एक ऑफर आली तेव्हा मी ती नाकारली. लोक काय म्हणतील याची मला भीती वाटत होती. खरं तर, त्या सीरिजची कथा खूपच चांगली होती आणि मला ती संधी हातून जाऊ द्यायची नव्हती, मात्र मी खूप घाबरेल होते आणि हे सांगायला मला लाज वाटत नाही,' असे ती म्हणाली.

2019 मध्ये घालण्यात आली होती पूर्ण बंदी

जम्मू-काश्मीरमधील उरी येथे 2016 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपट इंडस्ट्रीत काम करण्यास बंदी घालण्यात आली होती. यानंतर, 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाल्यानंतर अखिल भारतीय सिने कामगार संघटनेने पाकिस्तानी कलाकारांवर पूर्ण बंदी घालण्याची घोषणा केली होती.

'रईस' हा एकमेव बॉलिवूड चित्रपट
माहिराने व्हीजे म्हणून करिअरची सुरुवात एमटीव्ही पाकिस्तानबरोबर केली होती. 2011 मध्ये बोल या पाकिस्तानी चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. फवाद खानसोबतच्या 'हमसफर' या टीव्ही शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली. 2017 मध्ये माहिराने रईस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट राहुल ढोलकिया यांनी दिग्दर्शित केला होता. माहिराचा हा एकमेव बॉलिवूड चित्रपट आहे.

बातम्या आणखी आहेत...