आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता अजय देवगन लवकरच स्पोर्ट्स ड्रामावर आधारित मैदान हा चित्रपट घेऊन येत आहे. कोविड-19 मुळे सर्व चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जात असताना अजयच्या चित्रपटालाही पुढल्या वर्षीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणारा मैदान हा चित्रपट आता पुढच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे.
मैदान या चित्रपटाची नवीन रिलीज डेट अजय देवगणने स्वत: त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून जाहीर केली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना अजयने लिहिले, '2021 इंडिपेंडेन्स वीक, ही एक न ऐकलेली कहाणी आहे, ज्याचा प्रत्यमुळे भारतीयांना अभिमान वाटेल. 13 ऑगस्ट, तारीख मार्क करा. मैदान 2021', असे कॅप्शन त्याने दिले आहे.
अजय देवगणचा आगामी चित्रपट 'मैदान' हा एक स्पोर्ट्स ड्रामा बायोपिक असून सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे. सय्यद अब्दुल रहीम हा भारतीय फुटबॉल संघाचा प्रशिक्षक होते. 1950 -1963 या काळात, रहीम यांनी फुटबॉलकडे बघण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आणि देशाला आधुनिक फुटबॉलशी ओळख करून दिली. यापूर्वी हा चित्रपट 11 डिसेंबर 2020 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र चित्रपटाच्या एका भागाचे शूटिंग बाकी आहे.
या चित्रपटाचा सेट काही महिन्यांपूर्वी दहिसरमध्ये तयार करण्यात आला होता जेथे 9 एकरांवर ऑलिम्पिक मैदान आणि धावण्याचा ट्रॅक असे अनेक सेट्स तयार करण्यात आले होते. या सेटवर 30 ते 35 दिवसांचे शूटिंग अजूनही बाकी होते. पण लॉकडाऊन आणि कोरोना साथीच्या रोगामुळे शूटिंग होऊ शकले नाही. सेटची दुरुस्ती करण्यासाठी दर महिन्याला निर्मात्यांना कोट्यावधी रुपये खर्च करावे लागत होते, त्यामुळे सेट तोडण्यात आले. शूटिंग सुरू करण्यासाठी आता हे सेट पुन्हा तयार करावे लागणार आहे. सेट्स तयार करण्यासाठी 7 कोटी खर्च झाल्याचे वृत्त होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.