आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'मैंने प्यार किया' हा चित्रपट अभिनेता सलमान खानच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामुळे तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. पण या चित्रपटासाठी सूरज बडजात्या यांची पहिली पसंती सलमान नव्हती हे फार कमी लोकांना ठाऊक असावे. सलमानपूर्वी ही भूमिका बंगाली सुपरस्टार प्रोसेनजीतला ऑफर करण्यात आली होती, मात्र त्याने ती भूमिका नाकारल्यानंतर सलमानची वर्णी लागली होती. एवढ्या वर्षांनी अलीकडेच एका मुलाखतीत प्रोसेनजीतने हा खुलासा केला आहे.
प्रोसेनजीत म्हणाला - ते सोडा, विसरून जा...
प्रोसेनजीतने नुकतीच त्याची आगामी वेब सिरीज 'ज्युबिली'च्या प्रमोशनच्या निमित्ताने बॉलिवूड बबल मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रोसेनजीतला मैंने प्यार किया हा चित्रपट का सोडला? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तो म्हणाला, "ते सोडा. विसरून जा. आपण 'ज्युबिली'बद्दल बोलुया." तो पुढे म्हणाला की, चित्रपटांच्या निवडीबाबतचा त्याचा दृष्टिकोन आता बदलाल आहे. आता तो मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये काम करत नाही.
आता मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा नाही
प्रोसेनजीत पुढे म्हणाला- 'खर सांगू माझा शेवटचा हिंदी चित्रपट 'शांघाय' हा होता, ज्यामध्ये मी 10 ते 12 वर्षांपूर्वी काम केले होते. पण आता मी मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये काम करत नाही. मी नवीन दिग्दर्शकांसोबत काम करायला सुरुवात केली आहे."
प्रोसेनजीतने सांगितले होते 'मैंने प्यार किया' नाकारण्याचे कारण
काही दिवसांपूर्वी रेडिफला दिलेल्या मुलाखतीत प्रोसेनजीतने 'मैंने प्यार किया' हा चित्रपट नाकारण्याचे कारण सांगितले होते. तो म्हणाला होता, "मी अजूनही बडजात्या आणि भाग्यश्री यांच्या संपर्कात आहे. त्यावेळी माझा विजया पंडितसोबतचा 'अमर संगी' हा बंगाली चित्रपट प्रचंड हिट ठरला होता. माझ्या तारखा पूर्णपणे ब्लॉक होत्या. खरं तर मला 'मैंने प्यार किया'चा भाग व्हायचे होते, पण इच्छा नसतानाही मला ती ऑफर नाकारावी लागली होती. त्यावेळी मी चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांच्यासोबत एक बंगाली काम करत होतो, जे त्यावेळी खूप मोठे निर्माते होते."
प्रोसेनजीत नाकारला होता डेव्हिड धवनचा 'आंधिया' चित्रपट
प्रोसेनजीत पुढे म्हणाला, "एक दिवस पहलाजजी माझ्याकडे आले आणि म्हणाले, पुत्तर माझ्याकडे एक हिंदी चित्रपट आहे, ज्यामध्ये तू काम केलेच पाहिजे. डेव्हिड धवन दिग्दर्शित त्या चित्रपटाचे नाव 'आंधिया' असे होते. मात्र, त्यावेळी डेव्हिड इतके प्रसिद्ध दिग्दर्शक नव्हते. त्या चित्रपटात अभिनेत्री मुमताज माझ्या आईची भूमिका साकारणार होत्या. मला ही भूमिका थोडी कमी समजली, त्यामुळे मी ती करायला नकार दिला होता," अशी आठवण त्याने सांगितले.
दरम्यान प्रोसेनजीत 'ज्युबिली' या वेब सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत असून यात त्याच्यासह आदिती राव हैदरी, वामिका गब्बी आणि श्वेता बासू प्रसाद झळकणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.