आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे भाग्यश्री:'मैंने प्यार किया'मध्ये भाग्यश्रीने सलमान खानसोबत किसींग सीन देण्यास दिला होता नकार, सूरज बडजात्यांनी मग वापरली 'ही' आयडियाची कल्पना

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाग्यश्रीने सलमान खान आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत मंदिरात हिमालयसोबत लग्न केले होते.

'मैने प्यार किया' या चित्रपटातून सलमान खानबरोबर डेब्यू करणारी अभिनेत्री भाग्यश्री आज 53 वर्षांची झाली आहे. 23 फेब्रुवारी 1969 रोजी जन्मलेली भाग्यश्री चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही मालिकांमध्येही झळकली आहे. सांगलीचे राजा विजयसिंह राव माधवन राव पटवर्धन यांच्या घरी भाग्यश्रीचा जन्म झाला.

कुटुबीयांच्या मनाविरुद्ध केले लग्न
1989 मध्ये आलेल्या राजश्री प्रॉडक्शनच्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटाद्वारे भाग्यश्रीने सिनेसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी तिला 1 लाख रुपये मानधन मिळाले होते, तर सलमान खानला फक्त 30 हजार रुपये देऊन साइन करण्यात आले होते. या चित्रपटानंतर तिने त्यागी (1992), ​​पायल (1992), घर आया मेरा परदेसी (1993) सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. मात्र तिचे हे चित्रपट फ्लॉप ठरले.

वयाच्या 19 व्या वर्षी केले लग्न
वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी भाग्यश्रीने तिचा बालपणीचा मित्र हिमालय दासानीशी लग्न केले. भाग्यश्री हिमालयला पहिल्यांदा भेटली जेव्हा ती शाळेत शिकत होती. भाग्यश्रीच्या आईवडिलांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे तिने सलमान खान आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत मंदिरात हिमालयसोबत लग्न केले होते.

दीड वर्ष नव-यापासून वेगळी होती भाग्यश्री
गेल्या वर्षी भाग्यश्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात ती म्हणाली होती, “होय, माझे पहिले प्रेम हिमालय होते आणि त्यांच्याशीच मी लग्न केले. मात्र आयुष्यात असा एक काळ आला जेव्हा आम्ही एकमेकांपासून दुरावलो गेलो होतो. मी त्यांच्या आयुष्यात पुन्हा जाऊ शकेन की नाही, माझे दुसऱ्यासोबत लग्न झाले तर असे एक ना अनेक प्रश्न त्यावेळी माझ्या डोक्यात फिरत होते. जवळपास दीड वर्ष आम्ही एकत्र नव्हतो. तो क्षण जरी आठवला तरी आता भीतीने घाम फुटतो.” हिमालय आणि भाग्यश्री यांना अभिमन्यू हा मुलगा आणि अवंतिका ही मुलगी आहे.

चित्रपटात किसिंग सीन दिला नव्हता
भाग्यश्रीने 'मैने प्यार किया' या चित्रपटात किसींग सीन देण्यास नकार दिला होता. भाग्यश्रीच्या वडिलांनी तिला फक्त चुडीदार घालण्याची परवानगी दिली होती. चित्रपटासाठी तिने पहिल्यांदाच जीन्स आणि वन पीस ड्रेस परिधान केला होता. 2015 मध्ये एका मुलाखती दरम्यान सलमानने सांगितले होते की, भाग्यश्रीच्या नकारानंतर सूरज यांनी आमच्या दोघांमध्ये काचेची भिंत ठेवण्याची आयडिया दिली होती. चित्रपटासाठी भाग्यश्रीचा होकार मिळवण्यासाठी सूरज अनेकदा तिच्या घरी गेले होते.

बातम्या आणखी आहेत...