आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासूरज बडजात्यांच्या ब्लॉकबस्टर 'मैने प्यार किया' या चित्रपटाने सलमान खानला सुपरस्टार बनवले. हा चित्रपट सलमानच्या आधी अभिनेते पीयूष मिश्रा यांना ऑफर करण्यात आला होता. पीयूष यांनी सांगितल्यानुसार, त्याकाळात ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत होते.
पीयूष यांनी सांगितले की, बडजात्यांनी त्यांना ऑडिशनसाठी मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले होते. पण पीयूष शेवटच्या क्षणी मुंबईला गेला नाहीत. यामागचे कारण सांगताना पीयूष म्हणाले, त्यावेळी मला काय झाले होते हे मला माहीत नव्हते. मी जगापासून खूप हताश आणि निराश झालो होतो.
पीयूष एनएसडीमध्ये शिकत होते, तिथेच सूरज बडजात्याच्या वडिलांशी झाली होती भेट
ललनटॉपशी बोलताना पीयूष मिश्रा म्हणाले, 'मी एनएसडीमध्ये शिकत असतानाची ही गोष्ट आहे. मी शेवटच्या वर्षाला होतो आणि माझे शिक्षण पूर्ण व्हायला अवघे काही महिने बाकी होते. तेव्हा मी एक हुशार आणि चांगला दिसणारा मुलगा होतो. माझे फीचर्सही चांगले होते. एके दिवशी माझ्या शिक्षकांनी मला त्यांच्या चेंबरमध्ये बोलावले. त्यांनी माझी एका गृहस्थांशी ओळख करून दिली. मी त्यांचे नाव घेणार नाही, ते एक मोठे चित्रपट निर्माता होते आणि आपल्या मुलाला दिग्दर्शक म्हणून लाँच करत होता. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की ते 'मैंने प्यार किया' नावाचा चित्रपट बनवत आहेत. यासाठी त्यांनी नायिकेला कास्ट केले आहे, आता ते मुख्य अभिनेत्याच्या शोधात असून यासाठी ते एनएसडीमध्ये आले आहेत.
'त्यांनी माझा फोटो काढला आणि मला मुंबईला यायला सांगितले'
पीयूष पुढे म्हणाले, 'माझे फीचर पाहून त्यांना आनंद झाला, त्यांनी माझे नाव आणि माझ्याकडून माझी सर्व माहिती घेतली. त्यांनी मला त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दिले आणि मला मुंबईला येण्याचे आमंत्रण दिले. त्यावेळी मी मुंबईला येण्याचे त्यांना आश्वासनही दिले होते. माझा फोटो काढून ते निघून गेले. 15 दिवसांनंतर माझे शिक्षक मला भेटले आणि म्हणाले की, त्यांना माझ्यासाठी मुंबईहून कॉल आला असून ताबडतोब मला मुंबईला बोलावले आहे. मला या चित्रपटासाठी एनएसडी सोडावी लागली तरी मी मुंबईला जावे, असा त्यांचा आग्रह होता.'
शेवटच्या क्षणी पीयूष यांनी घेतली माघार
'मैंने प्यार किया'च्या दिग्दर्शकानेही पीयूष यांना मुंबईत येण्यास सांगितले. पण पीयूष यांच्या नशिबात वेगळेच काही लिहिले होते. ते पुढे म्हणाले, 'मी त्यांना येतो असे सांगितले होते, पण मी मुंबईत गेलो नाही. त्यावेळी मला जगाचा तिरस्कार का वाटू लागला हे समजत नव्हते.'
तीन वर्षांनी मी मुंबईला गेलो तेव्हा त्या चित्रपटातून सलमान खान नावाचा स्टार जन्माला आल्याचे पाहिले. मला त्याच्याबद्दल आनंद वाटला. पण मी स्वतःबद्दलही विचार केला की, त्या वेळी जर मी चित्रपट केला असता तर कदाचित मी नंतर ज्या प्रकारचे काम केले तसे करता आले नसते. प्रत्येकाचे स्वतःचे नशीब असते.' पीयूष यांनी सांगितल्यानुसार, जे काही घडले ते अपघातासारखे होते. त्यांना याबाबत कोणताही पश्चाताप नाही.
ठरला बॉलिवूडचा आयकॉनिक चित्रपट
'मैंने प्यार किया' हा बॉलिवूडमधील आयकॉनिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. रोमान्स आणि उत्तम संगीताची जोड असलेला हा चित्रपट 1989 मध्ये प्रदर्शित झाला होता. सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान आणि भाग्यश्री मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने जगभरात 28 कोटींची कमाई केली आणि तो ऑलटाइम ब्लॉकबस्टर ठरला.
स्क्रीन टेस्टमध्ये रिजेक्ट झाला होता सलमान खान
सूरज बडजात्या यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांना सलमानचा फर्स्ट लूक आवडला नव्हता. सूरज यांनी सांगितल्यानुसार, सलीम खान यांचा मुलगा आमच्यासोबत का काम करु इच्छितो असा पहिला प्रश्न त्यांना पडला होता.
सूरज म्हणाले, "मी त्याला (सलमान) मेसेज केला आणि तो मला भेटायला आला. तो खूप लहान दिसत होता. माझ्या मनात विचार येत होते की हा हिरो दिसेल का... पण जेव्हा त्याने मला त्याचे फोटो दाखवले तेव्हा मी थक्क झालो. नंतर मी त्याला स्टोरी ऐकवली.' येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.