आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'लिगर'च्या चित्रीकरणाला सुरुवात:डॉगीच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे चित्रपटाचे शीर्षक, डेमो फ्लॅटमध्ये शूट करण्यासाठी मेकर्स दररोज खर्च करत आहेत अडीच लाख रुपये

अमित कर्ण10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्माती चार्मी कौरच्या कुत्र्याच्या नावावर ठेवण्यात आले चित्रपटाचे शीर्षक

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे त्यांच्या आगामी 'लिगर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. मागील दोन दिवस अनान्याने वांद्रे येथील एका निर्माणाधीन इमारतीत चित्रपटाचे चित्रीकरण केले. वास्तविक, कोरोनामुळे मुंबईच्या निवासी भागात चित्रीकरणाला परवानगी मिळत नाहीये. अशा परिस्थितीत निर्माते एकतर मुंबईबाहेर शुटिंग करत आहेत. किंवा शहरात तयार होत असलेल्या इमारतींचा सहारा घेत आहेत.

सेटशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, डेमो फ्लॅटमध्ये शूट करण्यासाठी निर्माते दररोज अडीच लाख रुपये भाडे देत आहेत. याशिवाय बिल्डरने निर्मात्यांकडून चार लाख रुपये डिपॉझिट म्हणूनही घेतले आहेत. जेणेकरून फ्लॅटमध्ये काही नुकसान झाल्यास जमा झालेल्या पैशातून नुकसानभरपाई मिळू शकेल. गुरुवारी आणि शुक्रवारी अनन्या पांडेने डेमो फ्लॅटमध्ये शूटिंग केले. विजय देवरकोंडा शनिवारी मुंबईला पोहोचला आहे. आता या डेमो फ्लॅटमध्ये तो आपल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण करेल.

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या 13 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये झाले शूटिंग
सूत्रानुसार, वांद्रे येथे निर्माणाधीन इमारतीच्या 13 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अनन्याने शूट केले आहे. इमारतीच्या कंपाऊंडमध्ये 150 ज्युनिअर कलाकारांनीही शूटिंग केली. चित्रपटातील सिक्वेन्सनुसार, अनन्याने साकारलेले पात्र अतिशय लोकप्रिय झाले आहे. आणि तिची एक झलक बघण्यासाठी चाहते इमारतीखाली गर्दी करतात. चित्रपटाची निर्माता चार्मी कौरसुद्धा शूटच्या वेळी सेटवर हजर होती.

निर्माती चार्मी कौरच्या कुत्र्याच्या नावावर ठेवण्यात आले चित्रपटाचे शीर्षक
सूत्रानुसार, करण जोहरने चार्मी कौरच्या सांगण्यावरून चित्रपटाचे शीर्षक बदलले आहे. पहिले शीर्षक 'फाइटर' होते. नंतर ते 'टायगर' होणार होते. पण ते सलमान खानच्या चित्रपटाच्या नावाशी जुळत होते. अशा परिस्थितीत चार्मी कौरने या चित्रपटाचे शीर्षक तिचा कुत्रा 'लिगर'च्या नावावर ठेवले पाहिजे असे सुचवले. लिगरचा अर्थ सामर्थ्य आणि निष्ठेचे
प्रतीक असा आहे. निर्मात्यांना चार्मीची कल्पना आवडली. यानंतर चित्रपटाचे शीर्षक 'लिगर' हे फायनल करण्यात आले.