आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपटांची निर्मिती खर्चापेक्षा दीडपट अधिक कमाई, पैसे बुडण्याची शक्यता नाही अन् हमखास नफा

मुंबई ( अमित कर्ण )2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 30 कोटींच्या ‘गुलाबो सिताबो’ची डिजिटलवर 60 कोटींत विक्री, टीव्हीचे हक्क 20 कोटींत

चित्रपटगृहांऐवजी डिजिटल माध्यमावर प्रदर्शित होणारा ‘गुलाबो सिताबो’ हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. पुढील महिन्यात सहापेक्षा जास्त चित्रपट अोटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित होतील. यात विद्या बालनच्या ‘शकुंतला देवी’ आणि जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल’ या चित्रपटांचा समावेश आहे. विश्लेषकांच्या मते, गुलाबो सिताबोची निर्मिती किंमत ३० कोटी रुपये आहे. हा चित्रपट अॅमेझॉनने ६० कोटी रुपयांत विकत घेतला आहे. डिजिटलसोबतच सोनी टीव्हीला २० कोटीत चित्रपटाचे हक्क विकले आहेत. चित्रपटाचे शूटिंग उत्तर प्रदेशात झाल्याने ५ कोटींची सबसिडी मिळाली. चित्रपटगृहात प्रदर्शित न होताही ५० ते ५५ कोटींचा नफा झाला आहे. चित्रपटगृहात ६५ देशांत हा सिनेमा प्रदर्शित झाला असता, मात्र डिजिटल माध्यमांमुळे तो २०० देशांत पोहोचला आहे.

ट्रेड विश्लेषक राज बन्सल म्हणतात, “डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट अपयशी होण्याची शक्यता नसते, नफाही हमखास मिळतो. ३० कोटींमध्ये बनलेला ‘उरी’ जेव्हा २५० कोटींचा व्यवसाय करतो तेव्हा बॉक्स ऑफिसच्या ताकदीचा अंदाज येतो. त्याचप्रमाणे ५० कोटींत बनवलेल्या ‘कबीर सिंह’ आणि २५ कोटीत बनवलेल्या ‘स्त्री’ने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा व्यवसाय केला होता. डिजिटल प्लॅटफॉर्मची कमाई सब्सक्रिप्शन आधारित आहे. याअंतर्गत अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स किंवा इतरांच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले चित्रपट प्रेक्षक पाहतात. त्यांनी ‘गुलाबो सिताबो’ बघो वा ना बघो, कमाईत काही फरक पडणार नाही. कारण आधीच ग्राहकांनी पैसे दिलेले असतात. म्हणूनच प्रदर्शनानंतर त्याने किती कमाई केली याचा आकडा डिजिटल प्लॅटफॉर्मचे मालक देत नाहीत. गुलाबो सिताबोचे निर्माते रॉनी लाहिरी म्हणतात, डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपटगृहांपेक्षा दीडपट जास्त पैसे मिळतात. अमिताभ व आयुष्मानच्या फेस आणि ब्रँड व्हॅल्यूने आम्हाला दीडपट जास्त पैसे दिले आहेत.

ओटीटी प्लेटफॉर्मवर गुंजन सक्सेनाला मिळाले ६० कोटी

शकुंतला देवी 48 कोटी

सडक टू 50 कोटी

लक्ष्मी बम 80 कोटी

भूज 65 कोटी

मिमी 30 कोटी

शिद्दत 16 कोटी

गुंजन सक्सेना 60 कोटी

बातम्या आणखी आहेत...