आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साँग मेकिंग व्हिडिओ:असे तयार झाले 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' चित्रपटातील 'विघ्नहर्ता' गाणे, बघा गाण्याचा मेकिंग व्हिडिओ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे गाणे थिरकायला लावणारे आहे

'अंतिम: द फाइनल ट्रुथ'च्या निर्मात्यांनी 'विघ्नहर्ता'चा मेकिंग व्हिडिओ प्रदर्शित केला असून तो सद्याच्या टॉप-रेटेड ट्रॅकमधील एक आहे. मेकिंग व्हिडिओमध्ये एक आकर्षक आणि शानदार सेट-अप दाखवण्यात आला आहे, जो गणपती आणि त्या उत्साही वातावरणासाठी अगदी परफेक्ट आहे. मेकिंगमध्ये गणपती उत्सवाच्या भव्यतेला दाखवण्यात आले आहे जो या ट्रॅकमध्ये देखील आपण पहिला आहे.

व्हिडिओमध्ये चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारणाऱ्या सलमान खानची दमदार एंट्री दाखवण्यात आली आहे. मेकिंगवरून वरुण धवन आणि आयुषने या ट्रॅकमध्ये किती मेहनत घेतली आहे हे देखील दिसते. हे गाणे उल्हासपूर्ण आणि थिरकायला लावणारे आहे आणि त्याला तितकाच जबरदस्त सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान, आयुष जखमी झाला होता, पण तरीदेखील त्याने हे गाणे उत्कृष्ट सादर केले.

महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटातील डान्स ट्रॅकला ज्या तऱ्हेने प्रतिसाद मिळतो आहे, तो पाहता कलाकार आणि क्रू सदस्यांची कठोर मेहनत फळाला आली असून चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिक वाढवली आहे. 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' सलमान खान फिल्म्सद्वारे प्रस्तुत आणि सलमा खान यांच्याद्वारे निर्मित आहे. .

बातम्या आणखी आहेत...