आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा60 च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 86 वर्षे पूर्ण केली आहेत. माला सिन्हा अशा एक अभिनेत्री आहेत, ज्यांच्याकडे सौंदर्यासोबतच अभिनय कौशल्यही आहे. अभिनयासोबतच माला यांना संगीताचीही खूप आवड होती, पण त्यांनी अभिनयासाठी आपले सिंगिंग करिअर सोडले. आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक हिट चित्रपट देणाऱ्या माला त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. परंतु त्यांना त्यांच्या काळातील सर्वात कंजूष अभिनेत्री देखील म्हटले जाते. पैसे वाचवण्यासाठी माला सिन्हा यांनी कधीही घरात नोकर ठेवले नाहीत. त्या सर्व कामे स्वतः करत असे.
1978 मध्ये त्यांच्या घरी इन्कम टॅक्सने छापा टाकला आणि बाथरूममधून 12 लाख जप्त केले. हे प्रकरण कोर्टात पोहोचले आणि संपूर्ण 12 लाख जप्त होऊ नयेत, म्हणून वडील अल्बर्ट सिन्हा यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे पैसे वेश्याव्यवसायातून कमावल्याची कबुली कोर्टात दिली होती.
5 दशके बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या माला सिन्हा यांच्या मुलीला सिनेसृष्टीत त्यांच्यासारखे यश मिळू शकले नाही. म्हणून माला सिनेसृष्टीपासून दुरावल्या.
आज माला सिन्हा यांच्या वाढदिवसानिमित्त वाचा, त्यांच्या काही न ऐकलेल्या रंजक गोष्टी...
मित्रांनी चिडवल्याने बदलले स्वतःचे नाव
लहानपणी माला यांचे नाव एल्डा होते. त्यांच्यासोबत शाळेत शिकणारी मुलं त्यांना डालडा म्हणत चिडवायची, म्हणून त्यांनी नंतर स्वतःचे नाव बदलून बेबी नजमा असे ठेवले. जेव्हा त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी आपले नाव पुन्हा बदलले आणि माला सिन्हा ठेवले. माला यांना लहानपणापासूनच नृत्य आणि संगीताची आवड होती आणि त्यांनी त्याचे प्रशिक्षणही घेतले होते.
अभिनय कौशल्य पाहून चित्रपट दिग्दर्शकाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा दिला होता सल्ला नृत्य आणि गायनात निष्णात असण्यासोबतच माला शालेय नाटकांमध्येही भाग घेत असायच्या. एके दिवशी त्यांच्या शाळेत एक कार्यक्रम होता त्याला एका प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात माला सिन्हा एका नाटकात सहभागी झाल्या होत्या. दिग्दर्शकाने नाटकातील माला सिन्हांचा अभिनय बघितला आणि त्यांना त्यांचा अभिनय खूप आवडला. कार्यक्रम आटोपल्यानंतर दिग्दर्शक माला सिन्हा यांच्या घरी गेले. तेथे त्यांनी माला यांच्या वडिलांना सांगितले की, तुमच्या मुलीमध्ये उत्कृष्ट अभिनय कौशल्य आहे आणि ती एक सक्षम अभिनेत्री बनू शकते, त्यामुळे तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी द्या. माला यांच्या वडिलांना दिग्दर्शकाचे म्हणणे पटले आणि त्यानंतर माला बालकलाकार म्हणून काम करू लागल्या.
गीता बाली यांच्या विनंतीवरून बॉलिवूडमध्ये मिळाला फिल्मी ब्रेक
माला सिन्हा यांनी बालकलाकार म्हणून 'जय वैष्णोदेवी' या बंगाली चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 1952 मध्ये आलेल्या 'रोशनारा' या चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्या अनेक बंगाली चित्रपटांमध्ये झळकल्या. यादरम्यान माला एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत आल्या. येथे त्यांची भेट गीता बाली यांच्याशी झाली.
गीता बाली माला यांच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित झाल्या आणि त्यांनी दिग्दर्शक केदार शर्मा यांना विनंती केली की, त्यांनी मालाला बॉलिवूडमध्ये फिल्मी ब्रेक द्यावा. गीता यांच्या विनंतीनंतर केदार शर्मा यांनी त्यांच्या 'रंगीन रातें' या चित्रपटात माला यांना हिरोईन म्हणून कास्ट केले. यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले, पण त्या चित्रपटांमधून त्यांना विशेष ओळख मिळाली नाही.
अखेर प्रतीक्षा संपली आणि 1957 मध्ये 'प्यासा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. माला सिन्हाच्या कारकिर्दीत हा चित्रपट खूप हिट ठरला आणि येथूनच त्यांच्या करिअरला आकार मिळू लागला. या चित्रपटात त्या गुरू दत्तसोबत दिसल्या होत्या. मालापूर्वी हा चित्रपट मधुबालाला ऑफर करण्यात आला होता, पण मधुबालाने नकार दिला, त्यानंतर माला यांना या चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आले होते.
चित्रपटांसाठी आपले सिंगिंग करिअर सोडले
लहानपणापासूनच माला यांचा अभिनयापेक्षा संगीताकडे जास्त कल होता. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये गायिका म्हणूनही काम केले. पण चित्रपटांच्या निमित्ताने त्यांना गायन आणि अभिनय यापैकी एकाची निवड करावी लागली. अखेरीस, त्यांनी चित्रपटांसाठी त्यांचा गायन प्रवास थांबवला.
संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत फक्त एक नेपाळी चित्रपट केला
इकडे माला सिन्हा बॉलिवूडमध्ये यशोशिखर गाठत होत्या, तर दुसरीकडे नेपाळी फिल्म इंडस्ट्रीतूनही त्यांना ऑफर्स येऊ लागल्या. त्यानंतर त्या 1966 मध्ये नेपाळला गेल्या आणि नेपाळी चित्रपट 'माटी घर'मध्ये काम केले. माला यांच्या कारकिर्दीतील हा एकमेव नेपाळी चित्रपट होता. या चित्रपटाचे हीरो इस्टेट कंपनीचे मालक चिदंबर प्रसाद लोहानी होते.
सहकलाकाराच्या प्रेमात पडल्या आणि त्याच्याशी एक दोनदा नव्हे तर तीनदा लग्न केले या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माला त्यांचे को-स्टार चिदंबर प्रसाद यांच्या प्रेमात पडल्या, पण कुटुंबाने दोघांसमोर लग्नासाठी दोन अटी ठेवल्या. पहिली अट होती की, माला लग्नानंतर चित्रपटात काम करणार नाही आणि दुसरी अट होती की, लग्न रितीरिवाजानुसार होईल.
माला यांनी दोन्ही अटी मान्य केल्या, त्यानंतर घरच्यांच्या संमतीने लग्न झाले. मात्र, या लग्नाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे माला यांना आपल्या पतीसोबत 3 वेळा लग्न करावे लागले. दोघांनी आधी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले, नंतर हिंदू पद्धतीने आणि शेवटी कोर्ट मॅरेज केले. लग्नानंतर मालाची अभिनयाची आवड पाहून त्यांच्या पतीने त्यांना अभिनय करिअर सुरू ठेवण्यास सांगितले.
यामुळे लग्नानंतरही माला यांनी आपला अभिनय थांबवला नाही. त्यामुळे त्यांना पतीपासून दूर मुंबईत राहावे लागले. त्यांचे पती चिदंबर प्रसाद हे इस्टेट कंपनीचा व्यवसाय हाताळण्यासाठी बहुतेक नेपाळमध्ये राहत होते. माला यांना प्रतिभा नावाची मुलगी देखील आहे.
पैशासाठी कोर्टात वेश्याव्यवसायाची कबुली दिली होती
बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेल्या माला सिन्हा यांच्या आयुष्यात एक काळ असा आला होता, जेव्हा त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला. माला सिन्हा यशाच्या शिखरावर असतानाची ही गोष्ट आहे. चित्रपटसृष्टीतही त्या खूप कंजूष असल्याची चर्चा जोरात होती. त्यांनी आपल्या घरात नोकरही ठेवले नव्हते. पैसे वाचवण्यासाठी त्या आपली सर्व कामे स्वतः करायच्या. दरम्यान, आयकर विभागाने त्यांच्या घरावर छापा टाकला, ज्यामध्ये त्यांच्या घरातून 12 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले होते. हे पैसे त्यांच्या बाथरूमच्या भिंतीतून सापडले होते. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्याकाळात 12 लाख रुपये ही मोठी रक्कम होती. हे पैसे वाचवण्यासाठी माला सिन्हा यांनी कोर्टात एक धक्कादायक विधान लिहिले होते, जे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले.
एवढी मोठी रक्कम वाचवण्यासाठी माला सिन्हा यांचे वडील अल्बर्ट सिन्हाही पुढे आले होते. अल्बर्टच्या वकिलांनी अनेक युक्तिवाद केले, परंतु कोर्टावर कोणताही परिणाम होत नसल्याचे पाहून त्यांच्या वकिलांनी त्यांना एक सल्ला दिला. हे पैसे वेश्या व्यवसायातून कमावल्याचे कोर्टाला लिहून द्यावे असे माला सिन्हा यांना सांगण्यात आले. माला यांच्यासाठी स्वतःला असे सादर करणे अजिबात सोपे नव्हते. अखेर, माला यांनी कोर्टात एक धक्कादायक विधान केले, ज्यामुळे तेथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. वेश्याव्यवसाय करून हा पैसा मिळवल्याचे माला सिन्हा यांनी न्यायालयात सांगितले होते.
मुलगी फ्लॉप ठरल्यानंतर सिनेसृष्टीपासून झाल्या दूर
माला सिन्हा या त्यांच्या काळातील यशस्वी अभिनेत्री होत्या. त्या आपल्या चित्रपटांसाठीही मोठी रक्कम घेत असे. आईप्रमाणेच त्यांची मुलगी प्रतिभालाही अभिनेत्री व्हायचे होते. याच कारणामुळे तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्रीही घेतली, पण आईसारखे यश तिला मिळू शकले नाही. मुलीच्या अपयशानंतर माला सिन्हा यांनी पार्ट्यांमध्ये जाणे बंद केले आणि फिल्मी जगापासून दूर झाल्या. त्या आता लाइमलाइटपासून दूर राहतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.