आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्र्यांचे कार अपघात:मलायकापूर्वी 'या' अभिनेत्र्यांचाही झाला आहे कार अपघात; काहींचा चेहरा खराब झाला, तर काहींचा रक्ताने माखलेला

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या कारचा शनिवारी अपघात झाला. त्यात मलायकाला किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे पुढील उपचारासाठी तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मलायकाला आज दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मलायकाच्या अपघाताआधी अनेक अभिनेत्र्यांचे देखील अपघात झाले आहेत. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या सौंदर्यावर आणि करिअरवर झाला आहे. मलायका अरोराच्या अपघातपुर्वी हेमा मालिनी आणि शबाना आझमीपर्यंत अनेक अभिनेत्र्यांसोबत भयावह अपघात घडले आहेत. याविषयी आपण अधिकची माहिती घेऊया...

मलायका अरोराचा कार अपघात

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर मलायकाचा अपघात झाला होता. त्यानंतर तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मलायकाच्या प्रकृतीबाबत बहिण अमृता अरोराने माहिती दिली आहे. मलायकाची प्रकृती चांगली असून, तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशी माहिती अमृताने दिली. मनसेने गुडी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईत गुडी पाडवा मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या पार्श्वभुमीवर अनेक कार्यकर्ते पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना होत होते. त्यानंतर खालापूर नाकाजवळ ट्रॉफिक जॅम झाली होती. त्याचदरम्यान तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या त्यात, मलायकाच्या गाडीला स्वीफ्ट डिझायर गाडीने जोरात धडक दिली. त्यात मलायकाला किरकोळ दुखापत झाली.

शबाना आझमीचा अपघात

शबाना आझमी- जानेवारी 2020 मध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर शबाना आझमी यांच्यासोबत एक मोठी दुर्घटना घडली होती. या अपघात खालापूर टोल नाक्यजवळ झाला होता. या अपघातात शबाना आझमी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांची कार एका ट्रकला धडकली होती. त्यावेळी त्यांना पुढील उपचारासाठी पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेमा मालिनीचा अपघात

हेमा मालिनी- जुलै 2015 मध्ये राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात हेमा मालिनीच्या कार अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या कारसोबत धडक झालेल्या दुसऱ्या कारमधील एका लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला होता, तर चार जण जखमी झाले होते. या अपघातात हेमा मालिनींना देखील गंभीर दुखापत झाली होती.

महिमा चौधरीचा अपघात

महिमा चौधरी- महिमा चौधरी 1999 साली 'दिल क्या करे' या चित्रपटाची शुटिंग करत होती. त्यावेळी त्यांच्या कार अपघात झाला होता. त्या अपघातानंतर महिमाचा चेहरा पुर्णपणे खराब झाला होता. एका मुलाखतीत महिमाने सांगितले की, अपघातानंतर चेहऱ्याची सर्जरी करण्यात आली, त्यात 67 काचांचे तुकडे काढण्यात आले होते. या घटनेनंतर महिमाचे सौंदर्य मोठ्या प्रमाणात बिघडले होते.

अनु अग्रवालचा अपघात

अनु अग्रवाल- 1999 साली अनु अग्रवालचा अपघात झाला होता. हा अपघात इतका भयंकर होता की, अनु अग्रवाल कोमात गेल्या होत्या. सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर, अनु अग्रवालने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आणि अगदी हॉलिवूडमध्येही काम केले, परंतु एका अपघाताने तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.

बातम्या आणखी आहेत...