आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेकासाठी एकत्र आले मलायका-अरबाज:अरहानला घेण्यासाठी पोहोचले दोघे, नेटकरी म्हणाले - ते जागरुक पालक आहेत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा पुर्वाश्रमीचा पती अरबाज खान मंगळवारी रात्री एकत्र आले होते. याचे कारण होते त्यांचा मुलगा अरहान. झाले असे की, अरहान बुधवारी मुंबईत परतला. त्याला विमानतळावर घेण्यासाठी दोघेही एकत्र पोहोचले होते. त्यांच्या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अरहान खान एअरपोर्टच्या बाहेर येताच मलायकाने त्याला मिठी मारली. त्यानंतर अरबाजही आपल्या मुलाला मिठी मारली आहे.

नेटक-यांच्या प्रतिक्रिया
मलायका आणि अरबाज यांचा 2017 मध्येच घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही दोघे मुलासाठी कायम एकत्र येत असतात. काही दिवसांपूर्वीच जेव्हा अरहान मुंबईबाहेर गेला होता, तेव्हादेखील दोघेही त्याला सोडायला विमानतळावर आले होते. आता अरहान मुंबईत परतल्यानंतरही दोघे आईवडिलांचे कर्तव्य बजावताना दिसले. दोघांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता नेटकरी त्यावर कमेंट्स करत आहेत. अनेकांनी मलायका आणि अरबाजचे जागरुक पालक म्हणून कौतुक केले आहे. दोघे विभक्त झाले असले तरी ते जागरुक पालक आहेत, असे एका नेटक-याने म्हटले आहे. तसेच आई शेवटी आई असते, असेही एकाने म्हटले आहे.

घटस्फोटानंतर मलायका आपल्या मुलासोबत राहते
मलायका अरोराने 1998 मध्ये अभिनेता अरबाज खानशी लग्न केले होते. दोघांचा एक मुलगा आहे. लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मलायका आपल्या मुलासोबत राहते. सध्या त्यांचा मुलगा अरहान शिक्षणासाठी परदेशात राहतो.

मलायका अर्जुनसोबत लवकरच करु शकते लग्न
मलायकाने घटस्फोटाच्या वेळी अरबाजकडून 15 कोटी रुपये पोटगी घेतली होती. घटस्फोट झाल्यापासून मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे, तर अरबाज खान मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...