आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अरबाज खानची पुर्वाश्रमीची पत्नी आणि अभिनेत्री मलायका अरोरा मुंबईतील वांद्रे येथील ‘टस्कनी अपार्टमेंट’मध्ये वास्तव्याला असून ही इमारत आता बीएमसीने सील केली आहे. याचे कारण म्हणजे या इमारतीत राहणा-या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराला कंटेनमेंट झोन घोषित केले गेले आहे. वृत्तानुसार 8 जून रोजी ही इमारत सील केली गेली.
बीएमसीने इमारतीच्या बाहेरच्या परिसरात एक बॅनर लावले असून त्यावर कंटे कंटेंनमेंट झोन लिहिलेले आहे. ज्याची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरलही झाली. मलायका तिचा मुलगा अरहान आणि पाळीव डॉगी कॅस्परसह या इमारतीत राहते. मलायकाने मुलासह स्वतःला 14 दिवसांसाठी सेल्फ क्वारंटाईन केले आहे. यापूर्वी अभिनेता विक्की कौशलच्या इमारतीतही एका तरुणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर बीएमसीकडून ती इमारत सील करण्यात आली होती.
दोन दिवसांपासून योगाचे फोटो करतेय शेअर
गेल्या दोन दिवसांपासून मलायका तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर योगा करताना फोटो शेअर करतेय. बुधवारी तिने सर्वांगासन करतानाचा आपला फोटो शेअर केला. यासह तिने लिहिले, 'योग माझ्यासाठी तो एक तास आहे, जो मी कधीही विसरत नाही. म्हणून आपण # आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रतीक्षेत असताना मी तुमच्याबरोबर काही मजेदार गोष्टी शेअर करु इच्छिते. # 14दिवस 14आसन.'
तिने पुढे लिहिले की, 'मी दररोज एका आसनचा फोटो शेअर करेन, योग करायला मला आवडतं, आणि मी नियमितपणे तो करते. तुम्हीही मला तुमची योग करतानाची छायाचित्रे टॅग करु शकता.'
View this post on InstagramA post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on Jun 10, 2020 at 12:14am PDT
कोरोना बर्याच कलाकारांच्या घर आणि इमारतीपर्यंत पोहोचला
कोरोना विषाणूने चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक लोकांच्या घरात किंवा इमारतीत शिरकाव केला आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेते किरण कुमार, गायक कनिका कपूर, चित्रपट निर्माते करीम मोरानी आणि त्यांच्या दोन मुली, अभिनेता पूरब कोहली, अभिनेता फ्रेडी दारूवालाचे वडील, अभिनेता सत्यजित दुबेची आईला कोरोना विषाणूची लागण झाली होती. तर करण जोहर, बोनी कपूर आणि फराह अली खान यांच्या घरी काम करणा-या सदस्यांनाही कोविड 19 चा संसर्ग झाला होता. आता हे सर्वजण बरे झाले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.