आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Malaika Arora Car Accident | Car Accident Mumbai Pune Highway Malaika | Actress Malaika Arora's Car Crash; MNS Activists Hit Khalapur Toll Plaza

मलायकाला किरकोळ दुखापत:अभिनेत्री मलायका अरोराच्या कारचा अपघात; मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीने खालापूर टोल नाक्यावर दिली धडक

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीचा अपघात झाला आहे. खालापूर टोल नाक्याजवळ हा अपघात झाला असून, त्यात मलिकाला किरकोळ दुखापत झाली आहे. उपचारासाठी तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या मलायकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुडी पाडवा मुंबईत होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पुण्याहून मनसेच्या कार्यक्रमासाठी मुंबईत येत होते. या कार्यकर्त्यांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक जॅम झाली होती. त्यादरम्यान खालापूर टोलनाक्याजवळ तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यातील एक स्विफ्ट कार मलायकाच्या गाडीला धडकली, त्यामुळे या दुर्घटनेत मलायकाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मलायकाची प्रकृती चांगली असून, तिला लवकरच रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...