आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. चाहत्यांमध्ये दोघांच्या लग्नाच्या बातम्या अनेकदा येत असतात. अलीकडेच मलायकाने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर करत, मी हो म्हणाले, असे फोटोला कॅप्शन दिले. त्यानंतर अर्जुन आणि मलायका यांचा साखरपुडा झाल्याची जोरदार चर्चा रंगू लागली. पण आता यामागील सत्य समोर आले आहे. स्वतः मलायकाने तिच्या या पोस्टचा उलगडा केला आहे. नवीन रिअॅलिटी शोसाठी होकार दिला असल्याचे तिने सांगितले आहे.
रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे मलायका
लग्नाच्या अफवांदरम्यान मलायकाने तिच्या आगामी शोची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. पोस्ट शेअर करत मलायका म्हणाली- 'होय मी डिस्ने प्लस हॉट स्टारवर येत असलेल्या मुव्हिंग मलायका या रिअॅलिटी शोला हो म्हटले आहे. जिथे तुम्हाला माझ्याबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल. तुम्हाला काय वाटले... मी माझ्या रिअॅलिटी शोबद्दल बोलतेय, जो 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे,' असे मलायका म्हणाली.
मलायकाने फोटो शेअर करत साखरपुड्याची दिली होती हिंट
झाले असे की, मलायका अरोराने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला, ज्यात ती लाजताना दिसतेय. या फोटोमध्ये अभिनेत्रीने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केलेला दिसतोय. हा फोटो शेअर करत मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले - 'मी होकार दिला आहे.' मलायकाचे हे कॅप्शन वाचल्यानंतर चाहत्यांमध्ये तिने अर्जुनला लग्नासाठी होकार दिल्याची चर्चा रंगू लागली. त्यानंतर मलायकावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.
मलाइकाने अर्जुनशी खरंच साखरपुडा केला का?
खरंतर जूनमध्ये मलायका अर्जुनसोबत सुट्टीवर गेली होती. अभिनेत्रीने ट्रिपचे व्हिडिओ शेअर केले होते. त्यावेळी मलायकाने हिऱ्याची अंगठी फ्लाँट करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. मलायकाच्या त्या पोस्टपासून तिचा अर्जुनसोबत साखरपुडा झाल्याचा अंदाज चाहत्यांकडून लावला जात आहे. मात्र मलायकाकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
2019 मध्ये ऑफिशिअल केले होते नाते
अर्जुन आणि मलायका अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2019 मध्ये मलायकाने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे नात्याची अधिकृत घोषणा केली होती. जेव्हा या जोडप्याने त्यांच्या नाते जगजाहीर केले, तेव्हा त्यांना वयातील अंतरामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र, या जोडीला मीडिया आणि चाहत्यांचे भरभरून प्रेमदेखील मिळाले.
अरबाज आणि मलायका 2017 मध्ये वेगळे झाले
अरबाज आणि मलायका यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला होता. मलायका आणि अर्जुनमधील वाढती जवळीक हे त्यांच्या घटस्फोटाचे कारण होते. मलायकाने घटस्फोटाच्या बदल्यात पोटगी म्हणून अरबाजकडे 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका 10 कोटींपेक्षा कमी पैशात तडजोड करण्यास तयार नव्हती. अरबाजने मलायकाला पोटगी म्हणून 15 कोटी रुपये दिले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.