आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावूक झाली अभिनेत्री:मुलगा अरहान खानच्या नवीन प्रवासाच्या निमित्ताने भावूक झाली मलायका अरोरा, म्हणाली - ‘निरोप देणे खूप कठीण आहे’

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अरहान पुढील शिक्षणसाठी कुठे गेला, हे मलायकाने उघड केलेले नाही.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने सोशल मीडियावर मुलगा अरहानसोबतचा एक फोटो शेअर करत त्याला निरोप दिला आहे. अरहान हा पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जात आहे. यानिमित्ताने तिने एक फोटो शेअर करत अरहानसाठी भावूक नोट लिहिली आहे. तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘एका नवीन प्रवासाची सुरुवात करत असताना एक भीती, उत्साह, अस्वस्थता आणि नवीन अनुभव येत असतात. मला एवढचं माहित आहे की मला अरहानचा खूप अभिमान आहे. आता तुझे पंख पसरवण्याची आणि स्वप्न जगण्याची वेळ आली आहे. मला आता पासूनच तुझी आठवण येतेय.’

मलायकाने शेअर केलेल्या या फोटोत ती आणि अरहान दोघेही खिडकीतून बाहेर डोकावत असल्याचे दिसत आहे. अरहानने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे आणि मलायकाने गाऊन परिधान केला आहे.

मलायका म्हणाली - ‘निरोप देणे खूप कठीण आहे’
मलायकाने आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, यात अरहान त्याच्या डॉगीसोबत दिसतोय. हा फोटो मुंबई विमानतळावरील आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये मलायका लिहिते, ‘निरोप देणे खूप कठीण आहे.’ 18 वर्षीय अरहान हा मलायका आणि तिचा पुर्वाश्रमीचा पती अरबाज खान यांचा मुलगा आहे. अरहान पुढील शिक्षणसाठी कुठे गेला, हे मलायकाने उघड केलेले नाही. अरहानने 12 वी नंतर एक वर्षाचा गॅप घेतला होता.

घटस्फोटानंतर मुलासोबत राहते मलायका
मलायका आणि अरबाज खानच्या घटस्फोटानंतर मुलगा अरहानचा ताबा मलायकाला मिळाला. काही दिवसांपूर्वीच मलायकाने खुलासा केला की, तिची ब-याच दिवसांपासून मुलगी दत्तक घ्यायची इच्छा आहे. याविषयी तिने अरहानसोबत चर्चादेखील केली आहे. 2017 मध्ये मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट झाला होता. 2019 पासून ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय. लवकरच दोघे लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...