आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फॅशन आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. आता ती 'मूव्हिंग इन विथ मलायका' नावाचा धमाकेदार शो घेऊन येत आहे. या शोच्या माध्यमातून मी ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणार आहे. मलायकाच्या याशोचे OTT अॅप डिस्ने प्लस हॉटस्टारवर 5 डिसेंबरपासून ऑनलाइन स्ट्रीमिंग करण्यात आहे. या शोचा नवा प्रोमो मलायकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ती तिच्या आयुष्यातील गोष्टींवर भरभरून बोलताना दिसत आहे.
मलायकासोबत तिची बेस्ट फ्रेंड करीना कपूर खान आणि फिल्ममेकर फराह खानही दिसत आहेत. फराहसोबत आयुष्यातील निर्णयांबद्दल बोलताना मलायका भावूक झाली. फराहसोबत बोलताना मलायका म्हणते 'मी माझ्या आयुष्यात घेतलेले सर्व निर्णय योग्य होते. यावेळी तिला अश्रू अनावर होतात. त्यानंतर फराह मलायकाला म्हणते तू रडतानाही सुंदर दिसते. तर करीना मलायकाची प्रशंसा करताना म्हणते, ती मजेदार, हॉट आणि सुंदर आहे.
एका मुलाखतीमध्ये या शोबद्दल बोलताना मलायका म्हणाली होती की, या शोनंतर माझे चाहते मला जवळून जाणून घेतील. जगाने मला सोशल मीडियाच्या चष्म्यामधून मधून पाहिले आहे. पण यावेळी मी एक पाऊल पुढे घेतले असून उत्सुक आहे. या शोद्वारे मी माझ्या आणि माझ्या चाहत्यांमधील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करेल. चाहत्यांना मी माझ्या जगात बोलवणार आहे. हा एक मजेदार प्रवास असेल कारण मी माझ्या काही जवळचे कुटुंब आणि मित्रांसोबत माझे रुटीन जीवन दाखवणार आहे.
नुकतेच मलायका गर्भवती असल्याची अफवा उठली होती. त्यानंतर अर्जुन कपूरनेही यावर संताप व्यक्त करत हे खोटे असल्याचे म्हटले होते. . हा अत्यंत खालच्या स्तराचा प्रकार असल्याचे तो म्हणाला होता. अर्जून आणि मलायका अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही सतत चर्चेतही असतात. बी टाऊनमधील सर्वाधिक चर्चा होणाऱ्या कपलपैकी हे एक कपल आहे.
1998 मध्ये झाले मलायका-अरबाजचे लग्न
अरबाज आणि मलायका यांनी डिसेंबर 1998 मध्ये लग्न केले. 19 वर्षांनंतर दोघांचा मे 2017 मध्ये घटस्फोट झाला. अरबाज आणि मलायका यांना अरहान खान नावाचा 19 वर्षांचा मुलगा आहे. मलायका आणि अर्जुनमधील वाढती जवळीक हे त्यांच्या घटस्फोटाचे कारण होते. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघेही लवकरच एकमेकांसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत.
'छैय्या छैय्या' गाण्याने मलायका रातोरात बनली स्टार
मलायकाने अभिनेता-निर्माता म्हणून इंडस्ट्रीत काम केले आहे. तिने वयाच्या 20 व्या वर्षी काम सुरू केले आणि 'दिल से' चित्रपटातील 'छैया-छैया' गाण्याने ती रातोरात स्टार बनली. त्यानंतर तिने 'रंगीलो मारो ढोलना', 'मुन्नी बदनाम हुई' इत्यादी अनेक गाणांमध्ये मलायका दिसली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.