आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनमध्ये दुरावा:50 दिवसांपासून आपल्या कुटुंबाला भेटली नाही मलायका,  दुःखी होऊन म्हणाली - तुम्हा सर्वांची खूप आठवण येतेय

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मलायकाने लिहिले आहे, "50 दिवस.... आणि पुढेही हे सुरु राहणार... तुम्हा सर्वांची खूप आठवण येतेयं."

लॉकडाऊनमुळे सध्या घरात कैद असलेली मलायका अरोरा आपल्या कुटुंबियांच्या आठवणींनी व्याकूळ झाली आहे. तिने स्वत:चा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात ती आई जॉयस पॉलीकार्प, वडील अनिल अरोरा आणि बहीण अमृता अरोरासोबत दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये आपले दुःख व्यक्त  केले आहे.

मलायकाने लिहिले आहे, "50 दिवस.... आणि पुढेही हे सुरु राहणार...  तुम्हा सर्वांची खूप आठवण येतेयं."  यापूर्वी सोमवारी तिने 'क्वारंटाईनच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे लोक' हा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला. मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले होते, "वेगवेगळे प्रकार. मला खात्री आहे की तुम्ही मला यात शोधाल... मला शोधा .. (ज्यांची मी नावं घेऊ शकत नाही त्यांनाही शोधा.)"

रविवारी मलायकाने आपला मुलगा अरहानसोबतचा एक जुना फोटो शेअर करुन लॉकडाऊनपुर्वी ती सामान्य जीवन कसे व्यतीत करत होती हे सांगितले होते.  

बातम्या आणखी आहेत...