आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबाज खानचे गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत ब्रेकअप:मलायका म्हणाली - मी अरबाजला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल विचारत नाही

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अलीकडेच तिच्या 'मूव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने बोलताना दिसली. या शोमध्ये करण जोहरने मलायकाला तिचा पुर्वाश्रमीचा पती अरबाज खान आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीबद्दल काही प्रश्न विचारले, ज्याला मलायकाने अतिशय स्पष्टपणे उत्तर दिले.

मलायका अरबाज आणि त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलली
करणने मलायकाला शोमध्ये विचारले की, 'नुकतेच अरबाजचे जॉर्जियासोबत ब्रेकअप झाले, तेव्हा तू त्याच्याशी याबाबत बोललीस का?' याचे उत्तर देताना मलायका म्हणाली, 'अरबाज आणि जॉर्जियाच्या ब्रेकअपच्या अफवांवर माझा विश्वास नाही.'

मी अरबाजला असे प्रश्न विचारत नाही
मलायका पुढे म्हणाली, 'खर सांगू, मी त्याला असे प्रश्न विचारत नाही. मी अरहानला त्याच्या आयुष्यात काय चालले आहे? हे विचारत नाही. मला हे सगळे करायला आवडत नाही. असे केल्यास मी माझी मर्यादा ओलांडतेय असे मला वाटते. मला माहित आहे की असे अनेक कपल्स आहेत, ज्यांना घटस्फोटानंतर त्यांच्या मुलांकडून एकमेकांच्या आयुष्याबद्दल अपडेट मिळत असतात, पण मी त्यांच्यापैकी नाही. मी या सर्व गोष्टींपासून दूर राहते,' असे मलायका म्हणाली.

आताही आमच्यात चांगले समीकरण आहे
मलायकाशी पुढे बोलताना करणने विचारले की, वेगळे झाल्यानंतर तिचे अरबाजसोबतचे नाते कसे आहे? याला उत्तर देताना मलायका म्हणाली, 'मला वाटते की आमच्यात चांगले समीकरण आहे. आम्ही दोघे एकमेकांसोबत पूर्वीपेक्षा खूप चांगले राहतो.'

2017 मध्ये झाला मलायका-अरबाजचा घटस्फोट
मलायका अरोराने 1998 मध्ये अभिनेता अरबाज खानशी लग्न केले होते. दोघांचा अरहान हा मुलगा आहे. लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज अनेकदा त्यांच्या मुलासोबत स्पॉट झाले आहेत. मलायकाने घटस्फोटाच्या वेळी अरबाजकडून 15 कोटी रुपये पोटगी घेतली होती.

घटस्फोटानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे, तर अरबाज खान मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र आता अरबाज आणि जॉर्जियाच्या ब्रेकअपच्या बातम्या चर्चेत आहेत. दोघांमध्ये तब्बल 22 वर्षांचे अंतर आहे.

बातम्या आणखी आहेत...