आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायकाने घातली होती अरबाजला लग्नाची मागणी:म्हणाली- 'दबंग'नंतर आमचे नाते बिघडले, प्रत्येक गोष्टीवर वाद व्हायचा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अलीकडेच 'मुव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये स्वतःच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाली. या शोमध्ये मलायकाने अरबाजसोबतचे तिचे नाते कसे बिघडत गेले आणि तिने अरबाजला घटस्फोट का दिला? याचा खुलासा केला. सोबतच मलायकाने सांगितले की, तिला घराबाहेर पडायचे होते म्हणून तिने अरबाजसोबत लग्न केले होते.

मलायकानेच घातली होती अरबाजला लग्नाची मागणी
मलायका म्हणाली, 'मीच अरबाजला प्रपोज केले होते. हे कोणालाच माहीत नाही. अरबाजने मला प्रपोज केले नव्हते. 'मला लग्न करायचे आहे, तुम्ही तयार आहात का?' असे मी त्याला विचारले. त्यावर तो (अरबाज) प्रेमाने म्हणाला, 'तू जागा आणि दिवस ठरव.'

दबंगनंतर आमच्यात वाद होऊ लागले
मलायका पुढे म्हणाली, 'मी लग्नाच्या वेळी खूप लहान होते. मी पण बदलत गेले. मला आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी हव्या होत्या आणि मला वाटते की आज आम्ही खरोखर चांगल्या ठिकाणी आहोत. 'दबंग' रिलीज होईपर्यंत आमच्यात सर्व काही ठीक होते. पण त्यानंतर आमच्यातील चिडचिड वाढत गेली आणि आम्ही दोघे एकमेकांपासून दुरावत गेलो.' यादरम्यान फराहनेही सांगितले की, 'दबंग'नंतर दोघांमधील दुरावा वाढू लागला होता.

मलायका-अरबाजने लग्नाच्या 19 वर्षानंतर घेतला घटस्फोट
मलायका अरोराने 1998 मध्ये अभिनेता अरबाज खानशी लग्न केले. या लग्नापासून तिला एक मुलगा आहे. लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज अनेकदा त्यांच्या मुलासोबत एकत्र दिसत असतात. मलायकाने घटस्फोटाच्या वेळी अरबाजकडून 15 कोटी रुपये पोटगी घेतली होती. घटस्फोट झाल्यापासून मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे, तर अरबाज खान मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...