आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाला असला तरी दोघे नेहमी एकत्र दिसतात. मंगळवारी (3 डिसेंबर) रात्रीदेखील हे दोघे एकत्र दिसले. नुकताच या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी मलायकाला ट्रोल करत आहेत.
सोशल मीडिया यूजर्सनी केले ट्रोल
मलायका आणि अरबाज हे मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या एका रेस्तराँमध्ये एकत्र जाताना दिसले. यावेळी पापाराझींनी काढलेला या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी मलायका व्हाइट स्वेटर आणि ब्लॅक ब्लेझरसह ब्लू शर्ट कॅरी केले होते. तर अरबाज ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला.
आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, 'अरबाजला कोट घालून येणे गरजेचे होते का?' तर एका नेटकऱ्याने 'अर्जुन कुठे आहे, तो दिसत नाहीये,' असा प्रश्न विचारला. 'घटस्फोट घेतला असला तरी एकमेकांचे चांगले मित्र तर असू शकतात ना', असेही एकाने म्हटले आहे.
मलायकाचा ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ हा शो सध्या चांगलाच गाजतोय. यामध्ये शो ती तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे करताना दिसतेय. या शोमध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि मैत्रीण फराह खानशी बोलताना मलायकाने सांगितले होते की, तिने अरबाजला प्रपोज केले होते. "मी अरबाजला प्रपोज केले होते, हे कोणालाच माहीत नाही. अरबाजने मला प्रपोज केले नव्हते. तर मी त्याला लग्नासाठी विचारले होते. मला लग्न करायचे आहे, तू तयार आहेस का, असा प्रश्न मी त्याला विचारला. त्यावर तो अत्यंत शांतपणे म्हणाला, तू तारीख आणि जागा ठरव," असे मलायकाने या शोमध्ये सांगितले होते.
'दबंग' रिलीज झाल्यानंतर मलायका-अरबाजमध्ये खटके उडू लागले
'दबंग' रिलीज होईपर्यंत आमच्यात सर्वकाही ठिक होते. पण त्यानंतर हळूहळू गोष्टी बिघडत गेल्या, आमच्यात खटके उडू लागले आणि आम्ही एकमेकांपासून दूर जाऊ लागलो. प्रत्येक गोष्टीवर आमचा वाद व्हायचा,' असे मलायकाने आपल्या शोमध्ये सांगितले होते.
मलायका-अरबाजचा 2017 मध्ये झाला घटस्फोट
मलायका अरोराने 1998 मध्ये अभिनेता अरबाज खानशी लग्न केले होते. या लग्नापासून तिला एक मुलगा असून अरहान हे त्याचे नाव आहे. लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज अनेकदा त्यांच्या मुलासोबत दिसत असतात. मलायकाने घटस्फोटाच्या वेळी अरबाजकडून 15 कोटी रुपये पोटगी घेतली होती. घटस्फोट झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे, तर अरबाज खान मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.