आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलीकडेच मलायका अरोरा एका क्लिनिकबाहेर स्पॉट झाली होती. मलायका येताच पापाराझी तिचे फोटो-व्हिडिओ घेण्यासाठी क्लिनिकच्या दारात जमले.
पापाराझी घाईत मलायकाला धडकला
यादरम्यान मलायकाचा फोटो काढण्याचा प्रयत्न करणारा एक पापाराझी घाईघाईत तिला धडकला. त्याने कसेतरी स्वतःला सांभाळले आणि मलायकाची माफी मागितली. सोशल मीडियावरून हा व्हिडिओ समोर आला आहे. पापाराझीने अचानक तिला धडक दिल्यानंतर मलायका रागावलेली दिसत होती. व्हिडिओमध्ये मलायका मागे वळून पापाराझींना काहीतरी बोलताना दिसत आहे.
मलायका कॅज्युअल लूकमध्ये दिसली
यावेळी मलायका व्हाईट टँक टॉप आणि बॅगी पँटमध्ये दिसली. तिने तिचे अर्धे केस क्लच केले होते आणि पांढरे शूज घातले होते. मलायकाने सनग्लासेस लावलेले होते.
मलायकाच्या या व्हिडिओवर तिचे चाहते सोशल मीडियावर सतत कमेंट करत आहेत. एका युझरने लिहिले - एकतर स्वतःच बोलावतात, वरून इतका अॅटिट्यूड. तर एका यूझरने लिहिले - त्यांना त्यांचे आयुष्य का जगू देत नाही?
मलायका अरोरा शेवटची तेरा की ख्याल या म्युझिक व्हिडिओमध्ये गुरु रंधावासोबत दिसली होती. याशिवाय तिचा शो - मूव्हिंग इन विथ मलायका हा देखील गेल्या वर्षी हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.