आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कन्फर्म:मलायका अरोराने स्वतः दिली कोरोनाची लागण झाल्याची माहिती,  सोशल मीडियावर लिहिले-  मी ठिक असून घरातच क्वारंटाइन आहे

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी अभिनेता अर्जुन कपूरचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली. यापूर्वी म्हणजे रविवारी अभिनेता अर्जुन कपूरने त्याला कोरोेनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज स्वतः मलायकाने तिचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

हेल्थ अपडेट देताना मलायकाने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, 'आज माझा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, परंतु मी ठिक आहे, हे मला तुम्हा सर्वांना सांगायचे आहे. मला कोणतीही लक्षणे नाहीत. आणि मी सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे अनुसरण करत आहे. डॉक्टर आणि अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार मी घरातच क्वारंटाइन आहे. मी तुम्हा सर्वांना शांत व सुरक्षित रहाण्याची विनंती करते. आपल्या सर्व सहकार्याबद्दल धन्यवाद. खूप प्रेम, मलायका अरोरा', अशी पोस्ट तिने केली आहे.

View this post on Instagram

🙏😷

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on Sep 6, 2020 at 10:54pm PDT

  • सेलिब्रिटींनी दिल्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा

मलायकाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर बिपाशा बसु, काजल अग्रवाल, सुझान खान, नीना गुप्ता, विद्या माळवदेसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत लवकरात लवकर बरे होण्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • अर्जुन कपूरसुद्धा होम क्वारंटाइन

अभिनेता अर्जुन कपूरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित स्वतः अर्जुनने रविवारी याबद्दलची माहिती दिली. अर्जुनला कोणतीच लक्षणे नसून सध्या त्याला घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे. आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग तो अभिनेत्री नीना गुप्ता व रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत फिल्म सिटीमध्ये करत होता. अर्जुनला कोरोनाची लागण होताच या चित्रपटाची शूटिंग थांबवण्यात आली आहे. अर्जुनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ''मला कोरोनाची लागण झाली असून ही माहिती तुम्हा सर्वांना देणे हे माझे कर्तव्य आहे. मला कोणतीच लक्षणे नसून मी ठीक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी घरीच स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले असून पुढील काही दिवस क्वारंटाइनमध्येच राहणार आहे. माझ्या तब्येतीविषयीचे अपडेट्स मी तुम्हाला सोशल मीडियाद्वारे देत राहीन. या महामारीच्या काळात आपण सर्वजण मिळून या कोरोना विषाणूशी यशस्वी लढा देऊ अशी मला आशा आहे.''

0