आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायकाचा खरंच झाला साखरपुडा?:मलायकाने हातात अंगठी घातलेला फोटो केला शेअर, अर्जुन कपूरसोबत साखरपुडा झाल्याचे समजून नेटकरी देत आहेत शुभेच्छा

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या अंगठीमागचे सत्य काही वेगळेच असल्याचे बोलले जात आहे.

मलायका अरोराने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक शेअर केला आहेत. यात ती आपल्या हातातील अंगठी दाखवताना दिसतेय. मलायकाने हा फोटो पोस्ट केल्यानंतर तिने अर्जुन कपूरसोबत साखरपुडा केल्याची चर्चा रंगत असून नेटकरी तिला शुभेच्छा देत आहेत. मात्र या अंगठीमागचे सत्य काही वेगळेच असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे अंगठीचे सत्य?
मलायकाने हा फोटो खरं तर एका ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनसाठी शेअर केला आहे. तिने स्वतः फोटोच्या कॅप्शनमध्ये ही माहिती दिली आहे. ‘ही अंगठी एखाद्या स्वप्नासारखी आहे. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच्यासाठी भेटवस्तू घेऊ इच्छिता तर अंगठी हा उत्तम पर्याय आहे,’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. मलायकाने या अंगठीच्या ब्रँडला टॅग करताना पुढे लिहिले की, 'येथे साखरपुड्यासाठी अनेक चांगल्या डिझाइन उपलब्ध असून तुम्ही तुम्हाला हवे असल्यास कस्टमाइजदेखील करुन घेऊ शकता.' हे कॅप्शन बघता मलायका आणि अर्जुनचा साखरपूडा झाला नसून ती एका ब्रँडचे प्रोमोशन करत असल्याचे दिसत आहे.

लग्नाच्या नियोजनावर बोलली होती मलायका
सुमारे वर्षभरापूर्वी मलायका नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा 4' या चॅट शोमध्ये अर्जुनसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलली होती. तिने यावेळी आपल्या लग्नाच्या प्लानिंगबद्दलही सांगितले होते. त्यांचे स्वप्नवत लग्न हे एका बीचवर होईल आणि हा एक व्हाइट वेडिंग इव्हेंट असेल. लग्नात एली साबचा गाऊन परिधान करणार असल्याचेही मलायकाने सांगितले होते. पण हे दोघे लग्न कधी करणार याविषयी मात्र मलायका काहीही बोलली नव्हती. मलायका आणि अर्जुन कायम सोशल मीडियावर एकमेकांचे कौतुक करताना दिसत असतात. अर्जुनच्या मते तो मलायकाची चांगली छायाचित्रे क्लिक करत नाही , तर मलायका सांगते की, तिचे सर्वात चांगले फोटो अर्जुनच काढत असतो.

बातम्या आणखी आहेत...