आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबाजच्या कुटुंबाविषयी मलायकाचे वक्तव्य:म्हणाली - मी त्यांच्यासाठी पहिल्या क्रमांकावर कधीच नाही, मुलगा अरहानमुळे सगळे पाठिंबा देतात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने तिच्या 'मूव्हिंग इन विथ मलायका' या शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला. यावेळी ती तिचा पुर्वाश्रमीचा पती पती अरबाज खान आणि त्याच्या कुटुंबाविषयी बोलताना दिसली. ती म्हणाली की, अरबाजच्या कुटुंबासाठी ती नंबर 1 कधीच नव्हती, पण त्यांचा मुलगा अरहानमुळे सर्वजण तिला पाठिंबा देतात.

काही नाती आयुष्यभर टिकतात - करण
याबद्दल बोलताना मलायका म्हणाली, 'मी त्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कधीच येऊ शकत नाही. पण अरहानमुळे त्यांना माझी काळजी वाटते आणि असे करणेदेखील योग्य आहे.' यावर प्रतिक्रिया देताना करण म्हणाला, 'तुझ्या अपघातानंतर संपूर्ण कुटुंब तुझ्याबरोबर होते, ते आम्ही पाहिले. संपूर्ण खान कुटुंब तिथे होते. खरं तर काही नाती आयुष्यभर टिकतात.'

मलायकाच्या कारला 2 एप्रिल रोजी मुंबई-पुणे हायवेवर अपघात झाला होता. हा अपघात झाला तेव्हा मलायका पुण्याहून परतत होती. या अपघातानंतर खान कुटुंब मलायकासोबत हजर होते.

मलायकाने केले होते अरबाजला प्रपोज
मलायकाने काही दिवसांपूर्वी तिच्या याच शोमध्ये खुलासा केला होता की, तिने अरबाज खानला प्रपोज केले होते. ती म्हणाली होते, "लग्न झाले तेव्हा मी लहान होते. मला घरातून बाहेर पडायचे होते, म्हणून मी लग्न केले. अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही, पण मीच अरबाजला लग्नासाठी प्रपोज केले होते." मलायकाने अरबाजच्या स्वभावाबाबतही या शोमध्ये उघडपणे वक्तव्य केले होते. मलायका म्हणाली, "अरबाज खान एक उत्तम व्यक्ती आहेत. त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे. मला आयुष्यात जे काही करायचे होते, ते त्यांनी मला करू दिले. माझ्या यशस्वी आयुष्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे."

घटस्फोटानंतर मलायकाने घेतली होती 15 कोटींची पोटगी
मलायका अरोराने 1998 मध्ये अभिनेता अरबाज खानशी लग्न केले. दोघांना अरहान हा एक मुलगा आहे. लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज अनेकदा त्यांच्या मुलासोबत स्पॉट होत असतात. मलायकाने घटस्फोटाच्या वेळी अरबाजकडून 15 कोटी रुपये पोटगी घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...