आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ अपडेट:मलायका अरोरोला रुग्णालयातून डिस्चार्ज, बहिण अमृता म्हणाली- मलायकाची तब्येत आता ठीक आहे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर मलायकाचा अपघात झाला होता. त्यानंतर तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मलायकाच्या प्रकृतीबाबत बहिण अमृता अरोराने माहिती दिली आहे. मलायकाची प्रकृती चांगली असून, तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशी माहिती अमृताने दिली.

CT स्कॅन नॉर्मल

अमृता अरोराने सांगितले की, मलायका एका फॅशन कार्यक्रमातून मुंबईत परतत होती. त्यावेळी तिच्या कारचा अपघात झाला, तिच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सिटी स्कॅन देखील केले. मात्र, त्यात मलायकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली नाही असे समोर आले आहे. मलायकाला आज दुपारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनसेने गुडी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईत गुडी पाडवा मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या पार्श्वभुमीवर अनेक कार्यकर्ते पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना होत होते. त्यानंतर खालापूर नाकाजवळ ट्रॉफिक जॅम झाली होती. त्याचदरम्यान तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या त्यात, मलायकाच्या गाडीला स्वीफ्ट डिझायर गाडीने जोरात धडक दिली. त्यात मलायकाला किरकोळ दुखापत झाली.

बातम्या आणखी आहेत...