आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:मल्याळम अभिनेते प्रबीश शूटिंगदरम्यान सेटवर कोसळले, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मालवली प्राणज्योत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्यांच्या पश्च्यात वडील, पत्नी आणि एक मुलगी आहे.

मळ्याळम चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते प्रबीश चकलाकल यांचे शूटिंगदरम्यान निधन झाले. ते कोच्ची येथे शूटिंग करत होते. रिपोर्ट्सनुसार, 44 वर्षीय प्रबीश एका युट्यूब चॅनलसाठी एक व्हिडिओ शूट करत होते. त्याचवेळी ते कोसळले आणि बेशुद्ध पडले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

द न्यूज मिनिटनं दिलेल्या वृत्तानुसार, केरळमधील कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती करणारा व्हिडिओ प्रबीश शूट करत होते. त्यांच्या शूटिंगचा काही भाग संपल्यानंतर सेटवरच ते कोसळले. त्याआधी त्यांनी आपल्या सहकलाकारांसोबत एक ग्रुप फोटोही काढला होता.

प्रबीश यांनी अलीकडेच कोचीन कोलाज चॅनेलच्या ओणम शोमध्ये महाबलीची भूमिका केली होती. त्यांनी अनेक टेलिफिल्म्समध्ये काम केले आणि डबिंग कलाकार म्हणून अनेक चित्रपटात काम केले. त्यांनी अॅब्रिड शाईनवर आधारित कुंग फू मास्टर चित्रपटात खलनायकाच्या व्यक्तिरेखेसाठी डबिंग केले होते. ते जेएसडब्ल्यू सिमेंट्स लिमिटेडचे ​​कर्मचारीही होते. त्यांच्या पश्च्यात वडील, पत्नी आणि एक मुलगी आहे.