आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री अनिका विजय विक्रमन हिचे एक छायाचित्र समोर आले आहे, ज्यात तिचे डोळे सुजलेले दिसत असून चेहऱ्यावर जखमा आहेत. तिच्या चेहऱ्यावरील जखमांमुळे तिला ओळखणेही कठीण आहे. अनिकाने स्वत: आपल्या सोशल मीडिया हँडलवर दुखापतीचे फोटो शेअर एक्स बॉयफ्रेंडने प्राणघातक हल्ला केल्याचे सांगितले आहे.
पहिल्यांदा मारल्यानंतर त्याने पाय पकडून माफी मागितली
अनिकाने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, 'माझे अनूप पिल्लई नावाच्या व्यक्तीवर प्रेम होते. गेल्या काही वर्षांपासून तो माझ्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत होता. असा माणूस मी पाहिला नाही. हे सगळं करूनही तो मला घाबरवत आहे. तो माझ्याशी असे काही करेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता.'
'बंगळुरू पोलिसात त्याच्याविरोधात मारहाणीची तक्रार करण्याची ही माझी दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्याने मला चेन्नईमध्ये मारहाण केली होती, पण नंतर माझे पाय पकडून रडत माफी मागितली. मी त्याला माफ केले, हा माझा मुर्खपणा होता,' असे अनिकाने सांगितले.
मी फिर्याद दिल्यानंतरही तो मला मारहाण करायचा
अनिकाने पुढे सांगितले की, 'जेव्हा त्याने मला पुन्हा मारहाण केली तेव्हा मी त्याच्याविरुद्ध बंगळुरू पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र त्याने तिथे पोलिसांना लाच दिली. त्यानंतर पोलिसांनी परस्पर समेट घडवून आणण्यास सांगितले. पोलिस सोबत आहेत हे समजल्यानंतर त्याने पुन्हा मला मारण्याचे धाडस केले.'
मी शूटला जाऊ नये म्हणून त्याने माझा फोन तोडला
अनिकाने पुढे लिहिले- 'त्याने अशा प्रकारे अनेकदा माझी फसवणूक केली होती, त्यामुळे मला त्याला सोडावे लागले. पण तो मला सोडू इच्छित नव्हता. मी शूटला जाऊ नये म्हणून त्याने माझा फोन तोडला. याआधीही जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो, तेव्हाही तो माझ्या व्हॉट्सअॅप चॅट्सचा लक्ष ठेऊन असायचा.'
मारताना माझे तोंड दाबले, माझा श्वास अडकला होता
पुढे ती सांगते, 'दोन दिवसांपूर्वी हैदराबादला शिफ्ट होण्यापूर्वी त्याने माझा फोन लॉक केला होता. मग त्याने मला मुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. मी त्याला फोन मागितल्यावर त्याने माझा चेहरा दाबला. मला ब्राँकायटिस आहे, त्यामुळे मी श्वास घेऊ शकत नव्हते. माझा आवाज बाहेर येत नव्हता. मला वाटले ती माझ्या आयुष्यातील शेवटची रात्र होती.'
रात्रभर बाथरूममध्ये रडले
पुढे तिने लिहिले, 'मी स्वत:ला वाचवण्यासाठी दुसऱ्या खोलीत पळायचे तर तो दुसऱ्या चावीने कुलूप उघडून आत यायचा. बाहेर पळत जाऊन सिक्युरिटीची मदत मागितली असती तर तेही काही करू शकले नसते. मी रात्रभर बाथरूममध्ये रडत बसले माझ्यासोबत काय होत आहे याची माझ्या कुटुंबाला कल्पना नव्हती. माझ्या काही मित्रांनीही माझी फसवणूक केली आहे.'
माझ्यासोबत जे घडले त्यानंतरही मला धमकीचे फोन येत आहेत
एक दिवसापूर्वीही अनिकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या चेहऱ्याचे फोटो शेअर करून एक्स बॉयफ्रेंड अनूप पिल्लईवर प्राणघातक हल्ला आणि शारीरिक शोषणाचा आरोप केला होता. तिने लिहिले- 'माझ्यासोबत जे काही घडले ते मी विसरले असूनही, मला सतत धमकीचे फोन येत आहेत. माझ्या कुटुंबावर सातत्याने चिखलफेक होत आहे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.