आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रींचा लैंगिक छळ:केरळच्या मॉलमध्ये गर्दीत अडकल्या 2 अभिनेत्री, चुकीने स्पर्श करणाऱ्याच्या श्रीमुखात भडकावली

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मल्याळम अभिनेत्री सानिया अय्यपन केरळमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान लैंगिक छळाला बळी पडली. सानियाने बुधवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली. तिने लिहिले की, ती तिच्या आगामी ‘सॅटर्डे नाईट’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोझिकोड येथील हिलिट मॉलमध्ये गेली होती. येथे तिची को-स्टार ग्रेस अँटोनी आणि तिच्यासोबत गर्दीचा गैरफायदा घेत काही तरुणांनी गैरवर्तन केले.

ग्रेस हिनेदेखील सोशल मीडियावरही अशीच एक पोस्ट लिहिली आहे. सानियानेदेखील ती पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर सानियाचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये ती एका व्यक्तीच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. केरळ मॉलने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सुरक्षारक्षक गर्दी हाताळू शकले नाहीत

सानियाने लिहिले की, 'मी आणि चित्रपटाची टीम आमचा नवीन चित्रपट 'सॅटर्डे नाईट'च्या प्रमोशनसाठी कालिकटमधील एका मॉलमध्ये पोहोचलो होतो. संपूर्ण कालिकटमध्ये प्रमोशनचे कार्यक्रम चांगले झाले. आम्हाला इतके प्रेम दिल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत. या कार्यक्रमादरम्यान मॉलमध्ये खूप गर्दी होती आणि सुरक्षा यंत्रणांना गर्दी हाताळता आली नाही,' असे तिने सांगितले.

ती पुढे सांगते, 'मी आणि माझी एक सहकलाकार कार्यक्रमानंतर परत असताना काही मुलांनी माझ्या कोस्टारसोबत गैरवर्तन केले. गर्दीमुळे माझी कोस्टार त्या मुलाला बघू शकली नाही आणि तिला काही रिअॅक्शनही देता आली नाही.'

सानियाचे सोशल मीडियावर 2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
सानियाचे सोशल मीडियावर 2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

माझ्याशीही गैरवर्तन केले

सानियाने पुढे लिहिले, 'माझ्या कोस्टार्सीसोबत गैरवर्तन केल्यानंतर माझ्यासोबत असेच कृत्य घडले. मला धक्का बसला आणि तुम्ही माझी प्रतिक्रिया व्हिडिओमध्ये पाहू शकता. मी प्रार्थना करते की कुणालाही त्यांच्या जीवनात अशा प्रकारच्या आघातांना सामोरे जावे लागू नये. महिलांवरील अत्याचाराच्या या घटनेनंतर या लोकांवर कारवाई होईल, अशी आशा आहे,' असे ती म्हणते.

सानियाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून लोकांना कालिकट मॉल घटनेची माहिती दिली.
सानियाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून लोकांना कालिकट मॉल घटनेची माहिती दिली.

सानियाची थप्पड व्हायरल, मॉलमध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडली नाही

सानियाने तिच्या सोशल मीडिया पोस्टवर उल्लेख केलेला व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. गर्दीत अडकलेल्या सानियासोबत एका व्यक्तीने गैरवर्तन केल्यानंतर त्याच्या कानशिलात तिने लगावली आहे. ज्या हिलिट मॉलमध्ये ही घटना घडली आहे तो मॉल यापूर्वीही वादात सापडला आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये अभिनेता-निर्माता टोविनो थॉमस त्यांच्या थल्लुमला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या मॉलमध्ये गेले होते. तेव्हा त्यांच्या टीमला मॉलमध्ये येण्यापासून रोखण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...