आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'द कश्मीर फाइल्स' या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ममता यांनी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाला प्रोपगंडा फिल्म म्हणत चुकीचे विधान केल्याचे विवेक यांनी म्हटले आहे. या चित्रपटात कोणता प्रचार करण्यात आला आहे, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवावे, असे ते म्हणाले आहेत. विवेक यांनी सांगितल्यानुसार, ते आता बंगाल नरसंहारावरही चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत आणि हीच गोष्ट कदाचित ममता यांना आवडली नसावी. तसेच गेल्या एक वर्षापासून त्यांचे जगणे कठीण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
भाजप अशा लोकांना निधी देते - ममता बॅनर्जी
खरंतर विवेक अग्निहोत्री आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाद 'द केरला स्टोरी' हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सुरू झाला आहे. ममता बॅनर्जी सरकारने बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घातली आहे. राज्यातील ज्या थिएटर्सच्या स्क्रीनवर चित्रपट दाखवला जात आहेत, तिथून चित्रपट हटवा, असे त्या आदेश देताना म्हणाल्या. यावेळी त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’चा उल्लेख करीत टीका केली होती. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'काश्मीर आणि केरळनंतर आता बंगालला लक्ष्य करण्यात येत आहे. भाजप अशा लोकांना निधी देते. बंगाल फाइल्स बनवण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे,' असे त्या म्हणाल्या.
याला प्रत्युत्तर म्हणून विवेक अग्निहोत्री यांनी 'द कश्मीर फाइल्स'च्या संपूर्ण टीमच्या वतीने ममता यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ममता यांनी कोणत्या विचाराने आपल्या चित्रपटाला प्रोपगंडा आहे, याचे उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित असल्याचे विवेक यांनी म्हटले आहे.
ममता यांनी हे विधान बनावट धर्मनिरपेक्ष लोकांच्या लोकप्रियतेसाठी केले - विवेक विवेक पुढे म्हणाले, 'देशातील काही बनावट धर्मनिरपेक्ष लोकांमध्ये स्वस्त लोकप्रियता मिळवण्यासाठी ममता अशा प्रकारचे डावपेच अवलंबत आहेत. बंगाल हत्याकांडावर मी माझा चित्रपट बनवू नये अशी त्यांची इच्छा आहे. मी त्यांना नोटीस पाठवली असून त्यांना आमच्या चित्रपटात काय खोटे वाटले, असा प्रश्न विचारला आहे. ममता यांचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे, समाजात एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा विधानाची अपेक्षा करता येत नाही,' असे ते म्हणाले.
गेले एक वर्ष मी कसे जगत आहे हे फक्त मलाच माहीत आहे
पठाण या चित्रपटाच्या रिलीजवेळी विवेक अग्निहोत्री यांच्या मुलीचे भगव्या बिकिनीतील फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांची नेमकी कशी अवस्था झाली होती, याबाबत बोलताना विवेक अग्निहोत्री, 'गेले एक वर्ष मी कसे जगत आहे हे फक्त मलाच माहीत आहे. मी तर लिहिले होते की, स्वर्ग बनवायचा असेल तर नरकात राहावे लागेल. आज भारतातील राजकारणी आणि पत्रकार आणि अनेक सांप्रदायिक तथ्य तपासणार्यांनी माझ्या मुलीचे फोटो इन्स्टाग्रामवरून मिळवीत ते सोशल केले. हा गुन्हा आहे. पण मी गप्प राहिलो.
दिल्ली विधानसभेत विविध गोष्टी करण्यात आल्या. तेव्हाही मी गप्प राहिलो. पण लोकशाहीत चित्रपट निर्मात्याचे जगणे कठीण केले जात आहे. या विरोधात आवाज उठवून मी भावी पिढीसमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे, जेणेकरून सर्जनशील दिग्दर्शकाचा आवाज दाबून टाकण्याची हिंमत कोणी करू नये.'
'पठाण'च्या रिलीजवेळी व्हायरल झाले होते मुलीचे फोटो
शाहरुख खानच्या 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी 'पठाण'ला फटकारणारे ट्वीट केले आहे होते, तुम्ही धर्मनिरपेक्ष असाल तर हे पाहू नका. एवढेच नाही तर 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावर टीका करणाऱ्या एका लहान मुलीचा व्हिडिओही ट्वीट केला होता. विवेक अग्निहोत्रींच्या या ट्वीटवर लोक संतापले आणि त्यांनी अग्निहोत्रींची मुलगी मल्लिकाचे केशरी बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या फोटोनंतर विवेक अग्निहोत्रींना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.