आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ममता कुलकर्णीचा 49 वा वाढदिवस:90 च्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक होती ममता कुलकर्णी,  सर्व काही सोडून बनली साध्वी

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ममता कुलकर्णी आता साध्वी बनली आहे.

'आशिक आवारा', 'करण-अर्जुन' सारख्या चित्रपटात काम करून चर्चा एकवटणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी 49 वर्षांची झाली आहे. ममताचा जन्म 20 एप्रिल 1972 रोजी मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला होता. 90 च्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सेक्स सिम्बॉल म्हणून ओळख निर्माण करणारी ममता आता साध्वी झाली आहे. गेल्या दोन दशकांपासून लाइमलाइटपासून दूर असलेल्या ममताने आता अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. 2013 मध्ये तिचे एक पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

तामिळ चित्रपटाद्वारे केली होती करिअरची सुरुवात
1991 मध्ये ममताने आपल्या करिअरची सुरुवात 'ननबरगल' या तामिळ चित्रपटद्वारे केली होती. 1992 मध्ये 'तिरंगा' चित्रपटाद्वारे तिने बी-टाऊनमध्ये पदार्पण केले. 1993 च्या 'आशिक आवारा' या चित्रपटाने ममताला स्टारपद बहाल केले होते. या चित्रपटासाठी तिला ‘फिल्मफेअर न्यू फेस’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर ती 'वक्त हमारा है', 'क्रांतिवीर', 'करण अर्जुन', 'बाजी' या चित्रपटांमध्ये झळकली. 2002 मध्ये आलेला 'कभी तुम कभी हम' हा तिचा शेवटचा चित्रपट आहे.

ममताचे विवादाशी आहे नाते
शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, अनिल कपूर यासारख्या मोठ्या स्टार्ससह पडद्यावर काम करणारी ममता 1993 मध्ये स्टारडस्ट मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट केल्याने वादात अडकली होती. याशिवाय दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी 'चायना गेट' चित्रपटात ममताला मुख्य अभिनेत्री म्हणून घेतले. मात्र काही वादानंतर संतोषींना ममताला चित्रपटातून काढून टाकायचे होते. पण अंडरवर्ल्डमधून दबाव वाढल्यानंतर संतोषींनी ममताला चित्रपटातून काढले नाही, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर ममताने संतोषींवर लैंगिक छळाचा आरोप केला होता.

ड्रग माफियाशी थाटले लग्न
मीडिया रिपोर्टनुसार, ममता कुलकर्णीने दुबईत राहणा-या विकी गोस्वामी या अंडरवर्ल्ड ड्रग माफियाशी लग्न केले आहे. मात्र, ममताने नेहमीच तिच्या लग्नाच्या बातम्यांचे खंडन केले आहे. ममताने सांगितले, "मी कधीच कुणाबरोबर लग्न केलेले नाही. हे खरं आहे की माझे विकीवर प्रेम होते, पण त्यालादेखील हे समजेल आहे की, आता माझं पहिलं प्रेम ईश्वर आहे," असे ममता म्हणाली होती.

आता बनली साध्वी

एकेकाळी आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अदांनी चर्चा एकवटणारी ममता कुलकर्णी आता साध्वी बनली आहे. बॉलिवूडला रामराम ठोकून आता तिने अध्यात्माच्या मार्ग निवडला आहे. 2013 मध्ये तिचे 'ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगिनी' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. यावेळी ममता कुलकर्णी म्हणाली होती, 'काही लोक जगाच्या कार्यासाठी जन्माला येतात, तर काही भगवंतासाठी. माझा जन्मसुद्धा देवासाठी झाला आहे.'

बातम्या आणखी आहेत...