आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'वाट बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या’ यांसारख्या गाण्यांमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले आहे. दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. मानसीने एका मुलाखतीत घटस्फोटासाठी अर्ज दिल्याचे कबुल केले आहे. मानसी आणि प्रदीपयांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. इतकेच नाही तर त्यांनी एकमेकांबरोबरचे फोटोदेखील डिलिट केले होते. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना सुरुवात झाली होती. आता मानसी आणि प्रदीप यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरू झाला.
आधी ते दोघेही इन्स्टाग्राम पोस्टमधून एकमेकांवर आरोप करत होते. त्यानंतर ते नाट्य रिल्समध्ये बदलले. मानसी आणि प्रदीप यांनी इन्स्टाग्राम रिल्समधून एकमेकांवर आरोप केले होते. प्रदीपने काही दिवसांपूर्वी त्याचा एक रडणारा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत तो रडताना दिसला होता. आता या व्हिडिओवर मानसीने त्याला चांगलेच सुनावले आहे.
"एक नाही तर, आता दोन दोन मुली भेटल्या आहेत. खरं तर रडण्याच्या ओव्हर अॅक्टिंगसाठी 50 रुपये कापायला पाहिजेत. हा एकीकडे पार्टी करत असतो आणि रिल्समध्ये रडून दाखवतोय. खोटं प्रेम... मीच फुकटची सहानुभूती देते, ती पण फुकटात. जिच्या जिवावर खाल्लंस, जिचा वापर केला... कर्माची फळ मिळतातच," असं थेट मानसीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मानसीने या पोस्टमध्ये प्रदीपच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी तिने अप्रत्यक्षरित्या त्याला टोला लगावला आहे.
गेल्या वर्षी झाले होते लग्न
मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचे लग्न 19 जानेवारी 2021 रोजी झाले होते. लग्नाआधी दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. कोरोन काळात दोघे लिव्ह इन मध्ये राहिले होते. त्यानंतर दोघांनी लग्न केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.