आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

48 वर्षांची झाली मंदिरा बंदी:'शांती' मालिकेतून घराघरांत मिळाली होती ओळख, करिअरमुळे लग्नाच्या 12 वर्षांपर्यंत होऊ शकली नाही आई

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिराने लग्नाच्या 12 वर्षानंतर आई होण्याच्या निर्णय घेतला होता.

अभिनेत्री, मॉडेल, फॅशन डिझाइनर आणि टीव्ही प्रेजेंटर मंदिरा बेदी आज (15 एप्रिल) 48 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 15 एप्रिल 1972 रोजी कोलकातामध्ये झाला. मंदिराच्या वडिलांचे नाव वीरेंद्र सिंह बेदी आणि आईचे गीता बेदी आहे. तिला 90च्या दशकातील 'शांती' मालिकेसाठी विशेष ओळखले जाते.

या कौंटुबिक मालिकेत मंदिराने 'शांती' नावाच्या तरुणीचे पात्र साकारले होते. ती आपल्या हक्काची लढाई लढताना दिसते. या शोमधून मंदिरा घराघरांत पोहोचली पोहोचली होती, तिची 'शांती' म्हणून ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर मंदिराने 'औरत' आणि 'क्योंकी सास भी कभी बहू थी'सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले.

आयपीएल कव्हरेजही केले आहे
'शांती'मध्ये ग्लॅमर आणि झगमगाटापासून दूर राहिलेली मंदिरा बेदी आज आपल्या स्टाइल आणि ग्लॅमरस अवतारासाठी प्रसिध्द आहे. तिने अँकर म्हणून आयपीएल सीजन- 3 चे कव्हरेजदेखील केले होते. त्यादरम्यान तिने परिधान केलेली साडी खूप लोकप्रिय झाली होती. त्यानंतर तिने स्वत:चे एक साडी स्टोअरसुध्दा चालू केले होते.

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी अडकली लग्नगाठीत
मंदिराने प्रेमाच्या दिवशी अर्थातच व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी लग्न केले होते. 14 फेब्रुवारी 1999 रोजी तिने चित्रपट निर्माता राज कौशलसोबत सप्तपदी घेतल्या. दोघांना वीर नावाचा एक मुलगा आहे, त्याचा जन्म 19 जून 2011 रोजी झाला. मंदिराने लग्नाच्या 12 वर्षानंतर आई होण्याच्या निर्णय घेतला होता. याविषयी बोलताना एका मुलाखतीत मंदिराने खुलासा केला होता, ‘मी केलेल्या करारामुळे 2011 मध्ये वयाच्या 39 व्या वर्षी मी माझ्या मुलाला जन्म दिला. मला भीती वाटायची की जर मी गर्भवती झाले तर माझ्या करिअरला पूर्ण विराम लागेल’ असे मंदिरा म्हणाली होती. मंदिराने जुलै 2020 मध्ये एका मुलीला दत्तक घेतले असून तिचे नाव तारा ठेवले आहे. तारा आता चार वर्षांची आहे.

वयाच्या 48 व्या वर्षीही अगदी फिट आहे मंदिरा

48 वर्षीय मंदिराने आपले काम आणि फिटनेसमध्ये संतुलन राखले आहे. हेच कारण आहे, ज्यामुळे या वयातही ती अगदी तंदुरुस्त आहे. मंदिराला हा लूक नियमित वर्कआउट आणि फिटनेस डेडिकेशनमुळे मिळाला आहे. मंदिराच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकल्यास तिचे जिममध्ये वर्कआउट करतानाचे अनेक फोटो बघायला मिळतात.

एका मुलाखतीत मंदिराने तिच्या फिटनेसचे रहस्य सांगितले होते. तिने सांगितल्यानुसार, ती दररोज 10 किलोमीटर धावते. ती कुठेही असली तरी आपले स्पोर्ट्स शूज कायम सोबत ठेवतो. बाहेर कुठेही गेली तर आपल्या वर्कआउटमध्ये खंड पडू देत नसल्याचे मंदिराने सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...