आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कौशलच्या आठवणीत भावूक झाली मंदिरा बेदी:व्हॅलेंटाईन डे आणि अ‍ॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने मंदिराने शेअर केली भावूक पोस्ट, लिहिले - 'आज आमच्या लग्नाचा 23 वा वाढदिवस

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिरा आणि राज यांचे 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न झाले होते.

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदीने पती राज कौशलच्या आठवणीत एक भावूक पोस्ट लिहिली आहे. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आज राज हयात असते तर त्यांनी आपल्या लग्नाचा 23 वा वाढदिवस साजरा केला असता. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंदिराने राज यांचे स्मरण करत लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.

मंदिराने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "आज आमच्या लग्नाचा 23 वा वाढदिवस असता." यासोबत तिने हॅशटॅग व्हॅलेंटाईन डेचा वापर केला आहे. त्यासोबत तुटलेल्या हृदयाचा इमोजी वापरला आहे.

1999 मध्ये झाले होते लग्न
मंदिरा आणि राज यांचे 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न झाले होते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 2020 मध्ये राज आणि मंदिरा यांनी मुलगी ताराला दत्तक घेतले होते. मंदिरा आणि राज यांची पहिली भेट 1990 मध्ये मुकुल आनंद यांच्या घरी झाली होती. मंदिरा तेथे ऑडिशनसाठी गेली होती आणि राज हे मुकुल आनंदचे सहाय्यक म्हणून काम करत होते. येथूनच दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. 9 वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केले होते.

हृदयविकाराच्या झटक्याने झाले होते राज यांचे निधन
राज यांचे मागील वर्षी 30 जून रोजी पहाटे 4.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. राज 49 वर्षांचे होते आणि त्यांची प्रकृतीही ठिक होती. मीडिया रिपोर्टनुसार, राज कौशल यांना 29 जून रोजी संध्याकाळपासूनच अस्वस्थ वाटत होते, तसे त्यांनी आपल्या पत्नीला देखील सांगितले होते. त्यानंतर पित्तावर उपाय म्हणून त्यांनी एक गोळी घेतली होती. मात्र पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागले. राज यांनी पत्नी मंदिराला त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचे सांगितले. यानंतर मंदिराने तत्काळ आशिष चौधरीला फोन केला. आशिष आणि मंदिरा राज यांना गाडीतून रुग्णालयात नेत होते. यावेळी गाडीतच राजची प्रकृती अधिक खालावली. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. पुढच्या 5-10 मिनिटांत राज यांच्या हृदयाचे ठोके थांबल्याचे मंदिराच्या लक्षात आले. कदातिच तेव्हाच त्याने अखेरचा श्वास घेतला होता. जेव्हा ते रुग्णालयात पोहचले तेव्हा डॉक्टरांनी राज यांना मृत घोषित केले होते.

राज यांनी अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी आपल्या कारकीर्दीत 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी बेखुदी या चित्रपटातील स्टंट सीन दिग्दर्शित केले होते. याशिवाय राज कौशल जाहिरात विश्वातील प्रसिद्ध नाव होते.

बातम्या आणखी आहेत...