आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर परतली मंदिरा बेदी:पती राज कौशलच्या निधनानंतर मंदिरा बेदीची पहिली पोस्ट, पतीसोबतचा फोटो शेअर करत तुटलेल्या हृदयाचा इमोजीची पोस्ट केला

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिराने काहीच न बोलता अशा प्रकारे पतीच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे.

पती राज कौशलच्या निधनानंतर 5 दिवसांनी अभिनेत्री मंदिरा बेदीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात मंदिराने राजसोबतची तिची काही छायाचित्रे शेअर केली आहेत ज्यात दोघेही आनंदाचे क्षण घालवताना दिसत आहेत. मंदिराने या छायाचित्रांसह काहीही लिहिले नाही, फक्त तिने तुटलेल्या हृद्याचा इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी मंदिराने तिचा सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटो काढून टाकला आहे. त्याजागी आता तिने डीपीला ब्लॅक मार्क केला आहे. त्यामुळे आता फोटोच्या जागी तिथे काळा रंग दिसतोय. मंदिराने काहीच न बोलता अशा प्रकारे पतीच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने झाले होते निधन

राज यांचे 30 जुलै रोजी पहाटे 4.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. राज 49 वर्षांचे होते आणि त्यांची प्रकृतीही ठिक होती. मीडिया रिपोर्टनुसार, राज कौशल यांना 29 जून रोजी संध्याकाळपासूनच अस्वस्थ वाटत होते, तसे त्यांनी आपल्या पत्नीला देखील सांगितले होते. त्यानंतर पित्तावर उपाय म्हणून त्यांनी एक गोळी घेतली होती. मात्र पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागले. राज यांनी पत्नी मंदिराला त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचे सांगितले. यानंतर मंदिराने तत्काळ आशिष चौधरीला फोन केला. आशिष आणि मंदिरा राज यांना गाडीतून रुग्णालयात नेत होते. यावेळी गाडीतच राजची प्रकृती अधिक खालावली. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. पुढच्या 5-10 मिनिटांत राज यांच्या हृदयाचे ठोके थांबल्याचे मंदिराच्या लक्षात आले. कदातिच तेव्हाच त्याने अखेरचा श्वास घेतला होता. जेव्हा ते रुग्णालयात पोहचले तेव्हा डॉक्टरांनी राज यांना मृत घोषित केले होते.

अभिनेता म्हणून केली होती करिअरची सुरुवात
राज यांनी अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी आपल्या कारकीर्दीत 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी बेखुदी या चित्रपटातील स्टंट सीन दिग्दर्शित केले होते. याशिवाय राज कौशल जाहिरात विश्वातील प्रसिद्ध नाव होते.

1999 मध्ये झाले होते लग्न
मंदिरा आणि राज यांचे 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न झाले होते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गेल्या वर्षी राज आणि मंदिरा यांनी मुलगी ताराला दत्तक घेतले होते. मंदिरा आणि राज यांची पहिली भेट 1990 मध्ये मुकुल आनंद यांच्या घरी झाली होती. मंदिरा तेथे ऑडिशनसाठी गेली होती आणि राज हे मुकुल आनंदचे सहाय्यक म्हणून काम करत होते. येथूनच दोघांचे प्रेम सुरू झाले. 9 वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केले होते.

बातम्या आणखी आहेत...