आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पोन्नियिन सेल्वन-1'ने दुसऱ्या दिवशी 150 कोटींचा आकडा केला पार:'विक्रम'चा मोडला रेकॉर्ड

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पोन्नियिन सेल्वन-1' शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी केली. 'पोन्नियिन सेल्वन-1' (PS-1) ने ओपनिंग डेला जगभरात 83 कोटींहून अधिक कमाई केली, तर भारतात 42 कोटींहून अधिक कमाई केली.

तामिळनाडूमध्ये, 'पोन्नियिन सेल्वन-1' ला 2022 मधील तिसरी मोठी ओपनिंग मिळाली. आता राज्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'वलीमाई' आणि 'बीस्ट'नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. यासाठी 'पोन्नियिन सेल्वन-1' ने कमल हसन, विजय सेतुपती आणि फहद फाजील स्टार 'विक्रम'ला तिसऱ्या क्रमांकावरून हटवले आहे. 'विक्रम' या वर्षातील तमिळ चित्रपट उद्योगातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे आणि जगभरात सुमारे 432 कोटी रुपये कमावले आहेत. 'पीएस-१' ज्या प्रकारचे कलेक्शन करत आहे, त्यावरून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठे विक्रम करणार आहे हे निश्चित.

PS-1 भारतातील कलेक्शन
'पोन्नियिन सेल्वन-1' चित्रपटाने भारतात दुसऱ्या दिवशी 32 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अंतिम आकडेवारी समोर आल्यावर त्यात आणखी वाढ होऊ शकते. शुक्रवारी या चित्रपटाने भारतात 36.5 कोटींची कमाई केली. शनिवारचे कलेक्शन शुक्रवारच्या तुलनेत थोडे कमी असले तरी रविवारी चित्रपटाने मोठी झेप घेतली आहे. त्यानुसार, पहिल्या वीकेंडमध्ये 'पोन्नियिन सेल्वन-1'चे भारतातील कलेक्शन 100 कोटी पार करत असल्याचे दिसते.

तामिळनाडूमध्ये रेकॉर्ड वीकेंड
एकट्या तामिळनाडूमध्ये पहिल्या दिवशी 25 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या 'पोन्नियिन सेल्वन-1'ने शनिवारी राज्यात सुमारे 23 कोटी रुपयांची कमाई केल्याचा अंदाज आहे. त्यानुसार तामिळनाडूतील 'पोन्नियिन सेल्वन-1'चे दोन दिवसांचे कलेक्शन 47-49 कोटी रुपयांपर्यंत पोहचेल.

बॉक्स ऑफिस तज्ञ असे गृहीत धरत आहेत की, पोन्नियिन सेल्वन पहिल्या ओपनिंग वीकेंडमध्ये तामिळनाडूमध्ये 75 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणार आहे. आतापर्यंत कोणत्याही चित्रपटाने ओपनिंग वीकेंडमध्ये तमिळनाडूमध्ये एवढा कलेक्शन करू शकले नाही.

जगभरात 150 कोटी
'पोन्नियिन सेल्वन-1' ने पहिल्याच दिवशी जगभरात 83 कोटींहून अधिक कमाई केली होती. शनिवारी, भारतातील चित्रपटाचे एकूण कलेक्शन 40 कोटींच्या जवळपास असल्याचा अंदाज आहे. म्हणजेच, आतापर्यंत पोन्नियिन सेल्वन ची एकूण मिळकत 120 कोटी आहे. म्हणजेच अवघ्या दोन दिवसांत 'पोन्नियिन सेल्वन-1'चे जगभरातील कलेक्शन 150 कोटींहून अधिक झाले आहे.

रविवारी अ‍ॅडव्हान्स बुकिंग
पहिल्या दोन दिवसांत भरघोस कमाई करणारा 'पोन्नियिन सेल्वन-1' रविवारी आणखीनच कमाई करणार आहे आणि याचा पुरावा म्हणजे चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग. शुक्रवारी पोन्नियिन सेल्वन-1' ची अ‍ॅडव्हान्स तिकिटे 8 लाखांपेक्षा थोडी जास्त विकली गेली आणि अ‍ॅडव्हान्स बुकिंगची एकूण रक्कम 16.82 कोटी रुपये हो . शनिवारी 7 लाख 70 हजारांहून अधिक तिकिटांचे बुकिंग झाले असून, अ‍ॅडव्हान्स बुकिंगची एकूण रक्कम 15.32 कोटी रुपये झाली आहे.

आता रविवारच्या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग गेल्या दोन दिवसांपेक्षा जास्त झाले आहे. 'पोन्नियिन सेल्वन-1' साठी रविवारची जवळपास 9 लाख तिकिटे अ‍ॅडव्हान्स बुक करण्यात आली आहेत आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगची एकूण कमाई 17.77 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या दोन दिवसांपेक्षा रविवारी 'पोन्नियिन सेल्वन-1' अधिक कमाई करणार आहे, हे निश्चित. आणि चित्रपटाचा पहिला वीकेंड पूर्ण झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोजणाऱ्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. यासोबतच 'पोन्नीयिन सेल्वन-1'लाही दसऱ्याच्या सुट्टीचा मोठा फायदा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...