आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मनीष मल्होत्रा नीतू कपूर आणि त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी यांच्यासोबत 'द पंजाबन साँग'ची हुक अप स्टेप करताना दिसत आहे. चित्रपट निर्माता-दिग्दर्शककरण जोहरला हा व्हिडिओ डेडिकेट करताना मनीषने कॅप्शनमध्ये लिहिले, "करण हे तुझ्यासाठी आहे... आपल्या पंजाबनसोबत फ्रायडे नाइट लाइव्ह," असे मनीषने म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओवर करण जोहरने दिली प्रतिक्रिया
व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना करणने लिहिले, "खूपच अप्रतिम, तू हिरो व्हायला हवे." व्हिडिओमध्ये मनीष, नीतू आणि रिद्धिमा ब्लॅक आउटफिटमध्ये थिरकताना दिसत आहेत. राज मेहता दिग्दर्शित जुगजुग जियो 24 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात नीतू कपूरशिवाय अनिल कपूर, कियारा अडवाणी आणि वरुण धवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. व्हिडिओ पहा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.