आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी 5 डिसेंबर रोजी आपला 56 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने मनीष यांनी त्यांच्या घरी एक ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स उपस्थित होते. पार्टीचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत.
गौरी खान
मनीष मल्होत्राच्या पार्टीत शाहरुख खानची पत्नी गौरी खानही दिसली. यावेळी गौरी ब्लॅक आउटफिटमध्ये आकर्षक दिसली.
जान्हवी कपूर- खुशी कपूर
जान्हवी कपूरने तिची बहीण खुशी कपूरसोबत मनीष मल्होत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. ऑरेंज बॅकलेस ड्रेसमध्ये जान्हवी खूपच ग्लॅमरस दिसली.
वरुण धवन-नताशा दलाल
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन पत्नी नताशा दलालसोबत मनीष मल्होत्राच्या पार्टीत पोहोचला. वरुणने यावेळी पत्नी नताशासोबत पापाराझींना पोजही दिल्या.
सारा अली खान
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान पार्टीत पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसली. सारा व्हाइट टॉप ब्लू डेनिम जीन्स खूपच ग्लॅमरस दिसली.
करीना कपूर - मलायका अरोरा
बर्थडे पार्टीत करीना कपूर खान तिची बेस्ट फ्रेंड मलायका अरोरासोबत दिसली. यावेळी दोघांनी पापाराझींना एकत्र पोजही दिली. यावेळी करीना ब्लॅक अँड व्हाइट लूकमध्ये दिसतेय तर दुसरीकडे मलायकाचा सिल्व्हर आणि ब्लॅक आउटफिटमध्ये स्टायलिश लूक दिसला.
कार्तिक आर्यन
या पार्टीत कार्तिक आर्यनही पोहोचला होता. लूकबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक काळ्या लेदर जॅकेटमध्ये नेहमीप्रमाणे हॅण्डसम दिसला.
क्रिती सेनन
मनीष मल्होत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत क्रिती सेननही पोहोचली होती. पिंक कलरच्या आउटफिटमध्ये क्रिती खूपच सुंदर दिसली.
शिल्पा शेट्टी- शमिता शेट्टी
या पार्टीत बॉलिवूडची फिटनेस क्वीन शिल्पी शेट्टीही दिसली. पार्टीत ती खूपच कूल लूकमध्ये दिसली. यावेळी तिची धाकटी बहीण शमिता शेट्टीही तिच्यासोबत दिसली. दोन्ही बहिणींनी पार्टीत खूप मस्ती केली आणि फोटोही क्लिक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.