आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनीष पॉलच्या जाहिरातीवरून वाद:मनीषच्या नवीन जाहिरातीवर काश्मिरींची बदनामी केल्याचा आरोप, सोशल मीडियावरुन केली जातेय बंदी घालण्याची मागणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन दिवसांपूर्वी मनीष पॉलने ट्विटरवर जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला होता.

डॉलर या होजरी ब्रॅण्डच्या नवीन जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला आहे. टीव्ही होस्ट आणि अभिनेता मनीष पॉलवर चित्रित झालेल्या या जाहिरातीवर काश्मिरींची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप केला जात आहे. सोशल मीडिया यूजर्स मनीष आणि कंपनी या दोघांना विरोध करत असून ही जाहिरात हटवण्याची मागणी करत आहेत. तीन दिवसांपूर्वी मनीष पॉलने ट्विटरवर जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला होता.

मनीषने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "नोनू चिडिया दिग्दर्शित डालर थर्मलची ही नवी जाहिरात तुमच्यासोबत शेअर करताना आनंद होतोय. डॉलर अल्ट्रा आहे तर काहीही एक्स्ट्रा नको.'

नेटक-यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
मनीषच्या जाहिरातीवर टीका करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, "मनीष पॉल हे अपमानास्पद आहे. प्रत्यक्षात ही जाहिरात काश्मिरींच्या विरोधात आहे. आम्ही आमच्या पाहुणचारासाठी जगभर ओळखले जातो. मात्र तुम्ही आम्हाला चोर म्हणून दर्शवले. ते काढले जावे. काश्मीरमधील पर्यटकांविरूद्ध गुन्हेगारीचे प्रमाण 0% आहे."

आणखी एका यूजरने लिहिले, "मनीष पॉल आणि डॉलर बिग बॉस हे काढून टाका. किंवा काश्मिरला कधीही येऊ नका. काश्मीर पर्यटकांसाठी सर्वात सुरक्षित स्थान आहे. तुम्ही काश्मिरींना चोर दाखवून त्यांचा अपमान करत आहात. आम्ही हे स्वीकारू शकत नाही."

एका नेटक-याने लिहिले की, "काश्मिरच्या सुंदर पार्श्वभूमीवर आपण यातून काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात?"

जाहिरातीत काय दाखवले गेले
व्हिडिओत मनीष पॉल आपल्या जोडीदाराबरोबर सेल्फी घेत असता तेथे एक चोर येतो आणि त्याचे जॅकेट ओढून तेथून पळ काढतो. मनीष त्याचा पाठलाग करतो आणि मग ते दोघे एका तलावाच्या काठावर जाऊन थांबतात. यानंतर मनीष आणि त्याची जोडीदार त्यांचे सर्व कपडे चोराला देतात आणि म्हणतात, "डॉलर अल्ट्रा आहे... तर मग जास्तीचे काहीही नको."

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser