आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

एन्काउंटरनंतर विकास दुबेवर चित्रपट:मनोज बाजपेयी साकारु शकतो गँगस्टरची भूमिका, 15 कोटींच्या बजेटमध्ये चित्रपटाची तयारी करत आहेत निर्माते संदीप कपूर 

मुंबई (अमित कर्ण)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता मनोज बाजपेयी आणि निर्माता संदीप कपूर जुने मित्र आहेत.

शुक्रवारी सकाळी एसटीएफशी झालेल्या चकमकीत कानपूर येथील गुंड विकास दुबे ठार झाला. दुबेच्या नाट्यमय अटक आणि चकमकीनंतर बॉलिवूडला चित्रपटासाठी नवी स्क्रिप्ट मिळाली आहे. निर्माता संदीप कपूर यांनी  तर यावर चित्रपटाची घोषणादेखील केली आहे. त्यांनी चित्रपटाचे शीर्षक उघड केले नाही. पण चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी मनोज बाजपेयीला विचारणा करण्यात आली असून चित्रपटाचे बजेट जवळजवळ 15 कोटींच्या घरात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

'जुगाड' आणि 'अनारकली ऑफ आरा' सारखे चित्रपट बनवणा-या संदीप यांनी दैनिक भास्करसोबत झालेल्या बातचीतमध्ये चित्रपटाच्या प्लानिंगविषयी सांगितले. ते म्हणाले की, विकास दुबेच्या चकमकीनंतर मनोज बाजपेयीसोबत त्यांचे या चित्रपटाविषयी बोलणे झाले आहे. अद्याप मनोजने चित्रपट साइन केलेला नाही, पण चर्चा सुरू आहे.

  • 'दुस-या कुठल्या मोठ्या निर्मात्याने याच विषयावर चित्रपटाची घोषणा करु नये ही भीती'

संदीप यांच्या म्हणण्यानुसार,  या विषयावर एखाद्या मोठ्या निर्मात्याने चित्रपटाची घोषणा करु नये, ही भीती त्यांना वाटतेय. ते म्हणाले,  "अजून चित्रपटासाठी दिग्दर्शकाची निवड झालेली नाही.  मी आशा करतो की एखादा मोठ्या निर्माता या विषयावर चित्रपची घोषणा करणार नाही. मी एक छोटा निर्माता आहे. हा चित्रपट प्राधान्याने व्हायला हवा असे मनोजदेखील सांगत आहेत. आत्ता आम्ही चित्रपटाच्या कथेवर काम करू. दरम्यान एखाद्या मोठ्या बॅनरने चित्रपटाची घोषणा केली तर मग सगळं काही देवाच्या हाती असेल."

  • शीर्षकाबद्दल बोलणे खूप घाईचे ठरेल 

संदीप यांना या चित्रपटाचे शीर्षक काय आहे असे विचारले असता ते म्हणाले की, "याबद्दल आता बोलणे फार लवकर होईल. सध्या तीन-चार शीर्षक डोक्यात आहेत, आज उद्यामध्ये ते रजिस्टर करुन घेईल.'' 

  • दिग्दर्शकाच्या नावावरही विचार सुरु आहे 

संदीप यांच्या सांगण्यानुसार, अद्याप दिग्दर्शकाचे नाव फायनल झालेले नाही. आम्ही सध्या पर्यायांचा विचार करतोय. तीन - चार दिग्दर्शकांना एप्रोच होऊ.' संदीप यांनी सांगितल्यानुसार, ते तिग्मांशू धुलिया आणि शाह अली यांना दिग्दर्शनासाठी विचारणा करणार आहेत, मात्र अद्याप अंतिम सहमती होणे बाकी आहे.

  • कथेवर दोन ते तीन महिने संशोधन होईल

संदीप म्हणाले की, आधी कथेवर दोन ते तीन महिने संशोधन होईल. निर्माता म्हणून, ते शक्य तितक्या लवकर काम सुरु करतील. ही वेब सीरिज नसेल. तर एक हार्डकोर फिल्म असेल. त्यांच्या मते, मनोज या भूमिकेला योग्य न्याय देईल. यूपी आणि बिहारमधील त्यांची पार्श्वभूमी हे यामागील प्रमुख कारण आहे.

संदीप यांनी सांगितल्यानुसार, मनोज हा त्यांचा खूप जुना मित्र आहे आणि या चित्रपटासाठी ते त्याचा होकार नक्कीच मिळवू शकतील. त्यांनी सांगितले की, सिनेमॅटोग्राफिकली हा खूप चांगला विषय आहे, असे मनोज त्यांना म्हणाला होता." 

0