आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोजचे वडील रुग्णालयात:मनोज बाजपेयीचे वडील राधाकांत यांची प्रकृती गंभीर, शूटिंग अर्ध्यावर सोडून मनोज बाजपेयी दिल्लीत दाखल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोज बाजपेयीच्या वडिलांचे नाव राधाकांत बाजपेयी असे आहे.

'द फॅमिली मॅन' फेम अभिनेता मनोज बाजपेयी याच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना शुक्रवारी दिल्लीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. वडिलांच्या तब्येतीची बातमी समजल्यावर मनोज त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण अर्ध्यावर सोडत दिल्लीत दाखल झाला आहे.

मनोज बाजपेयीच्या वडिलांचे नाव राधाकांत बाजपेयी असे आहे. ते 83 वर्षांचे आहेत. मनोजचे वडील शेतकरी आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. केरळमध्ये मनोजच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.

जूनमध्ये बिघडली होती मनोजच्या वडिलांची तब्येत
यावर्षी जून महिन्यातही मनोजच्या वडिलांची प्रकृती बिघडली होती. वडिलांच्या तब्येतीची बातमी समजल्यानंतर मनोज त्याच्या कुटुंबासह त्याच्या बिहार येथील बेतिया या गावात गेला होता. त्यावेळी फ्लाइट मिस झाल्याने त्याने कुटुंबासह कारने मुंबईत ते बेतिया असा प्रवास केला होता.

जीना इसी की नाम है या शोमध्ये मनोज आणि त्याचे वडील राधाकांत सहभागी झाले होते.
जीना इसी की नाम है या शोमध्ये मनोज आणि त्याचे वडील राधाकांत सहभागी झाले होते.

मनोज बाजपेयीने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, 'मी माझ्या आईवडिलांच्या खूप जवळ आहे. माझ्या वडिलांनी माझ्या आणि माझ्या बहीणभावंडांच्या शिक्षणासाठी खूप संघर्ष केला. त्यांनी त्यांचे आवडते अभिनेते मनोज कुमार यांच्या नावावर माझे नाव मनोज ठेवले होते.'

बातम्या आणखी आहेत...