आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोज बाजपेयीचे आईचे छत्र हरपले:गीता देवी यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या आईचे गुरुवारी सकाळी निधन झाले आहे. गीता देवी यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील 20 दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज सकाळी 8.30 वाजता त्यांनी दिल्लीतील मॅक्स पुष्पांजली या रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात तीन मुले आणि तीन मुली, सुना-जावाई आणि नातवंडे असा परिवार आहे.

मनोज बाजपेयींसाठी आई होती आधारस्तंभ, कुटुंबातील सलग चौथा मृत्यू
मनोज बाजपेयींसाठी त्यांची आई आधारस्तंभ होती. त्यांच्या निधनाने अभिनेत्याला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही महिन्यातील मनोज बाजपेयी यांच्या घरातील हा चौथा मृत्यू आहे. गेल्याचवर्षी मनोज बाजपेयींनी आपल्या वडिलांना गमावले होते. राधाकांत बाजपेयी यांचे गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झाले होते. ते 85 वर्षांचे होते. त्यानंतर त्यांच्या सासूबाई आणि पत्नी नेहाची आई शकीला रझा यांचे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात निधन झाले होते. गेल्या वर्षीच नेहाने तिचे वडील गमावले होते.

वडिलांसोबत मनोज बाजपेयी
वडिलांसोबत मनोज बाजपेयी

गेल्या वर्षी मनोज बाजपेयींनी त्यांचे वडील गमावल्यानंतर चाहत्यांसाठी आणि मित्रांबद्दल कृतज्ञतेची एक चिठ्ठी लिहिली होती. “माझ्या वडिलांच्या दुःखद निधनाबद्दल प्रार्थना आणि प्रेम पाठवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार, जे मला अशा कठीण प्रवासात जाण्याचे एकमेव कारण आणि आधार होते, ज्यांनी मला स्वप्नात पाहिलेले सर्व काही मिळवून दिले!! तुम्हा सर्वांचे सदैव ऋणी आहे,” असे मनोज यांनी ट्विटरवर लिहिले होते.

मनोज वाजपेयी हे मूळचे बिहारचा असून शिक्षणासाठी दिल्लीला आले होते. त्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. 'द फॅमिली मॅन 2' या त्यांच्या वेब सिरीजला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. गेल्या काही दिवसांत त्याने चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार कामगिरी केली आहे.

अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला आई वडिलांनी दिल्याचे मनोज यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 18 वर्षांचा असताना ते दिल्लीला आले आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मनोज बाजपेयी यांनी 1994 मध्ये 'बँडिट क्वीन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'सत्या', 'पिंजर', 'कौन', 'गँग्स ऑफ वासेपूर', 'स्पेशल 26', 'अय्यारी' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या.

बातम्या आणखी आहेत...